प्रेक्षक, लेखक, कलावंतांचा थेट संवाद

पुणे : टाळेबंदीमुळे टीव्ही मालिकांची चित्रीकरणे बंद असल्याने दैनंदिन मालिकांना मुकणाऱ्या प्रेक्षकांशी थेट जोडले जाण्यासाठी ऑनलाइन कार्यक्रम होत आहेत. ऑनलाइन रंगणाऱ्या या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत असून, मालिकांच्या वेळेप्रमाणेच प्रेक्षक या ऑनलाइन कार्यक्रमांच्या ठरलेल्या वेळी समाजमाध्यमांवर दाखल होत आहेत.

करोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने टाळेबंदी लागू के ली. त्यामुळे मालिकांची चित्रीकरणे बंद झाल्याने कलाकारांनाही घरात राहावे लागत आहे. वाचन, लेखन करतानाच प्रेक्षकांशी असलेला संवाद कायम ठेवण्यासाठी ऑनलाइन कार्यक्रम सुरू करण्यात आले. एकाचवेळी वेगवेगळे कलाकार कार्यक्रमात सहभागी होऊन अभिवाचन, गायन, वादन अशा विविध प्रकारांचे सादरीकरण करत असलेले कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर रंगत आहेत.

थिएट्रॉन आणि रुमा क्रिएशन्स यांच्या ‘पाचचा चहा’ या कार्यक्रमात अजय पूरकर, दिक्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, हरीश दुधाडे हे कलाकार सहभागी होतात. तर काही कलाकार पाहुणे म्हणून सहभागी होतात. ‘कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद  मिळत आहे. एक दिवसाआड होणाऱ्या या कार्यक्रमाचे आतापर्यंत नऊ भाग सादर झाले. दीडशे ते दोनशे प्रेक्षक पूर्णवेळ कार्यक्रम पाहतात. कार्यक्रमाची एकू ण प्रेक्षकसंख्या पस्तीस हजारांपेक्षा जास्त आहे. आम्ही आता ३ मेपर्यंतच्या कार्यक्रमांचे नियोजन के ले आहे,’ असे लेखक दिग्दर्शक दिक्पाल लांजेकरने सांगितले.

इंडियन मॅजिक आयतर्फे  ‘अल्पविराम’ हा कार्यक्रम सादर के ला जातो. या कार्यक्रमाच्या प्रतिसादाविषयी चिंतामणी वर्तक म्हणाले, की टाळेबंदी सुरू झाल्यावर काहीतरी सर्जनशील आणि दर्जेदार आशयनिर्मिती आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याच्या विचारातून ‘अल्पविराम’ हा कार्यक्रम सुरू झाला. आम्ही टाळेबंदी संपेपर्यंतचे नियोजन के ले आहे. लाईव्ह कार्यक्रम असल्याने प्रेक्षक आणि कलाकार थेट जोडले जातात. आतापर्यंतच्या २५ भागांना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. दर कार्यक्रमाला पाच ते सहा हजार प्रेक्षक असतात. तर एकू ण दोन ते तीन लाख प्रेक्षकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला आहे.

साहित्य क्षेत्रातील रोहन प्रकाशनतर्फे  फे सबूकवर ‘गपशप दिल से’ हा कार्यक्रम के ला जात आहे. ‘टाळेबंदीमुळे साहित्य क्षेत्रातील कामकाज थांबले आहे. त्यामुळे लेखक-वाचक संवादासाठी, साहित्य चर्चा होण्यासाठी ऑनलाइन कार्यक्रम करण्याची कल्पना आली. के वळ पुस्तकांचीच चर्चा नाही, तर आताच्या परिस्थितीच्या अनुषंगाने माहिती देण्याचाही प्रयत्न आहे. साधारणपणे १० हजारांपेक्षा जास्त प्रेक्षकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचत आहे. तसेच लेखक, संपादक, प्रेक्षक यांचा सहभाग असलेला ‘व्हिडिओ पॉडकास्ट’ हा स्वतंत्र कार्यक्रमही सुरू आहे,’ असे रोहन चंपानेरकर यांनी सांगितले.