News Flash

आचार्य अत्रे यांच्यामुळे मुंबईऐवजी राज्याचे नाव महाराष्ट्र झाले

मुंबईऐवजी राज्याचे नाव महाराष्ट्र झाले. ही कणखर भूमिका त्यांनी घेतली होती

प्रतिनिधिक छायाचित्र

न्या. विद्यासागर कानडे यांचे मत

नाटक, चित्रपट, पत्रकारिता, राजकारण, काव्य, विडंबनकाव्य, शिक्षण अशा सगळ्याच क्षेत्रामध्ये आचार्य अत्रे यांनी आपल्या कर्तृत्वाने यशाचे शिखर पादाक्रांत केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ते अग्रेसर होते. त्यांच्यामुळेच मुंबईऐवजी राज्याचे नाव महाराष्ट्र झाले. ही कणखर भूमिका त्यांनी घेतली होती. म्हणूनच अत्रे यांना अभिवादन करायचे असेल तर आपण संकुचित वृत्ती सोडून मेहनतीद्वारे महाराष्ट्र घडविला पाहिजे, असे मत निवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी रविवारी व्यक्त केले.

आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानतर्फे आचार्य अत्रे यांच्या जन्मदिनानिमित्त कानडे यांच्या हस्ते दिग्दíशका सुमित्रा भावे, ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे, ज्येष्ठ रंगकर्मी शरद भूताडिया, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे, अंतर्नाद मासिकाचे संपादक भानू काळे, विनोदी लेखक सु. ल. खुटवड, पत्रकार मधुकर भावे, विद्या गावंडे, उद्योजक राहुल लिमये, विभावरी दिवेकर, प्रणव दिवेकर, मेजर (निवृत्त) सुभाष गावंड, देविदास फुलारी, अनिल दीक्षित, आलोक निरंतर यांना आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबुराव कानडे या वेळी उपस्थित होते.  या वेळी काणे, नयना आपट  यांचे भाषण झाले. बाबुराव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 12:49 am

Web Title: because of acharya atre state name changed mumbai to maharashtra
Next Stories
1 पवना धरण १०० टक्के भरले; पिंपरी-चिंचवडकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न सुटला
2 कौटुंबिक न्यायालयातील दावे कमी व्हावेत- मुख्यमंत्री
3 आदिवासींच्या समृद्धीसाठी योगदान द्या- महापौर
Just Now!
X