कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी मी स्वतः फिर्यादी असताना, मलाच पोलिसांकडून जिल्हा बंदीची नोटीस बजाविण्यात आली आहे. बंदी असली तरी, मी उद्या अभिवादन करण्यास जाणार असल्याचा निर्धार आंबेडकरी चळवळीतील नेत्या सुषमा अंधारे यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना व्यक्त केला.  यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, कोरेगाव भीमा येथून २०१७ रोजी अभिवादन करून, घरी बसने येत होते. त्या दरम्यान बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे बसची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली.

या दंगली विरोधात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्या संपूर्ण घटनेचा तपास पोलिस यंत्रणेकडून सुरू आहे. या प्रकरणात मी फिर्यादी असून, पोलिसांकडून मलाच जिल्हा बंदीची नोटीस मागील वर्षी आणि यंदा देखील बजावण्यात आली आहे. त्यामुळे चोराला सोडून सन्याशाला शिक्षा, या म्हणीप्रमाणे माझी अवस्था झाली आहे. मला आता पर्यंत पाच पोलीस स्टेशन मार्फत नोटीस बजविण्यात आल्या आहेत.

nashik, 14 Malnourished Children, Found in Trimbakeshwar Taluka, Treatment Malnourished Children , malnutrition in Trimbakeshwar Taluka, malnutrition in nashik, nashik news, Trimbakeshwar news,
त्र्यंबकेश्वर तालुक्यात १४ कुपोषित बालके, ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्याचे आदेश
BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
Crime against four for polluting Pavana river
पिंपरी : पवना नदी प्रदूषित करणाऱ्या चौघांवर गुन्हा

तरी देखील मी उद्या भीमा कोरेगाव येथे अभिवादन करण्यास जाणार असल्याचा निर्धार असल्याचे त्यांनी बोलून दाखवला. संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यासह ७४० व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाईकोरेगाव भीमा येथील एक जानेवारी २०२० च्या अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र त्यापूर्वीच पुणे ग्रामीण पोलिसांकडून संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यासह 740 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.