02 December 2020

News Flash

बिटकॉइन फसवणूक प्रकरणी अमित भारद्वाजला १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

या प्रकरणात यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर पोलीस आणखी सहा आरोपींचा शोध घेत आहे. बिटकॉइन घोटाळा जून २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत

पुणे : बिटकॉइन फसवणूक प्रकरणातील प्रमुख आरोपी अमित महेंद्रकुमार भारद्वाज आणि विवेककुमार महेंद्रकुमार भारद्वाज यांना न्यायालयाने १३ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर पोलीस आणखी सहा आरोपींचा शोध घेत आहे. बिटकॉइन घोटाळा जून २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत घडला होता. या प्रकरणातील मुख्या आरोपी असलेले अमित महेंद्रकुमार भारद्वाज आणि विवेककुमार महेंद्रकुमार भारद्वाज या दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी विशेष सरकारी वकील सुनील हांडे यांनी युक्तीवाद केला.

ते म्हणाले, ही संबंधित कंपनी सिंगापूरची असून आरोपींनी काही आपल्याकडील माहिती डिलीट केली आहे. त्यामुळे सर्व माहिती तसेच लॉग इन आयडी आणि पासवर्ड घेण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केल्यावर न्यायालयाने १३ एप्रिल पर्यँत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या बिटकॉइन फसवणूक प्रकरणी देशभरात तीन गुन्हे दाखल असून त्यातील दोन गुन्हे निगडी आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 7:53 pm

Web Title: bitcoin cheating case pune amit bhardwaj is arrested police custody till 13 april
Next Stories
1 ICICI बँकेच्या CEO चंदा कोचर यांच्या दीराला देशाबाहेर जाताना मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात
2 सिगारेटच्या पाकिटावर आता टोल फ्री क्रमांक आणि प्रबोधनात्मक चित्र
3 सलमानचे जोधपूर तुरुंगातील फोटो पाहिलेत का?
Just Now!
X