03 March 2021

News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये आढळल्या बॉम्ब सदृश वस्तू

भंगार विक्रेत्याने वस्तू आणल्याचा संशय

पिंपरी-चिंचवडमध्ये बॉम्ब सदृश वस्ती सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. आज सकाळी पोलिसांना याबाबत फोनवरून माहिती देण्यात आली. त्यानंतर त्वरीत पोलीस घटनास्थळी पोहचले. दरम्यान, चार लोखंडाच्या बॉम्ब सदृश वस्तू असल्याचे निदर्शनास आले असून ते रस्त्याच्या कडेला सापडल्या होत्या. परंतु याचा कोणताही धोका नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्ब सदृश वस्तू चिंचवडच्या वेताळ वस्ती भागातील रस्त्यावर आढळली आहे. असल्याची माहिती कंट्रोल रूमला देण्यात आली. त्यानुसार चिंचवड पोलीस घटनास्थळी पोहचले. पंरतु तपासानंतर चार लोखंडी अवजड बॉम्ब सदृश आढळल्या असून त्याचा कोणालाही धोका नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली होती. भंगार विक्रेत्याने या वस्तू लष्कराच्या भागातून आणल्या असाव्यात असा संशय पोलिसांना असून त्या दिशेने तपास सुरू आहे. रस्त्यावर बेवारस पद्धतीने अशा वस्तू टाकणे चुकीचे आहे असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं. संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 12:43 pm

Web Title: bomb like objects found in pimpri chinchwad kjp 91 jud 87
Next Stories
1 Video : कुस्तीचं मैदान गाजवणाऱ्या आळंदीच्या ‘गुंड’ मुलीची कहाणी
2 संगनमताच्या नालेसफाईला चाप!
3 उद्योगनगरीपुढे मोठी आव्हाने
Just Now!
X