24 October 2020

News Flash

विश्वजीत कदम यांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅगमुळे थोडक्यात बचावले

पुण्यात रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला

काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि आमदार विश्वजीत कदम यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. पुण्यात रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने विश्वजीत कदम यांना कोणतीही इजा झाली नसून, ते थोडक्यात बचावले आहेत. एअर बॅगमुळे विश्वजीत कदम यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र गाडीचं खूप मोठं नुकसान झालं आहे. विश्वजीत कदम काँग्रेसचे दिवंगत नेते पंतगराव कदम यांचे पुत्र आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विश्वजीत कदम रात्री कराडच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. पुणे शहरात आले असता विश्वजीत कदम यांच्या कारचा भीषण अपघात झाला. कराडमध्ये आयोजित कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण उपस्थित असणार आहेत.

अपघातानंतर काही वेळाने विश्वजीत कदम कराडच्या दिशेने रवाना झाले. विश्वजीत कदम सांगलीतील पलुस कडेगाव मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदारपदी निवडून आले आहेत. शिवसेनेचे उमेदवार संजय विभुते यांचा पराभव करत त्यांनी निवडणूक जिंकली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 12:05 pm

Web Title: congress mla vishwajit kadam car met with accident sgy 87
Next Stories
1 मी आवाहन करुन फायदा नाही, कारण शिवसेना माझं ऐकणार नाही – अमृता फडणवीस
2 शेतकऱ्यांबद्दल आस्था की नौटंकी? पीक विम्याशी संबंध नसलेल्या कंपनीत शिवसैनिकांचा राडा
3 जाणून घ्या मुख्यमंत्र्यांच्या ‘संजय भाऊ सॉरी’ या बॅनर मागील सत्य
Just Now!
X