News Flash

पुण्यात अर्ध्या तासात होणार करोना टेस्ट, रॅपिड अँटिजेन टेस्ट किट उपलब्ध

आयसीएमआर मान्यताप्राप्त एक लाख किटची महापालिकेकडून खरेदी

पुणे शहरात करोना विषाणूंचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिके मार्फत आयसीएमआर मान्यता प्राप्त 1 लाख रॅपिड अँटिजेन टेस्ट किट खरेदी केले आहेत.  हे सर्व किट दाखल झाले असून यामुळे एखाद्या व्यक्तीला करोना झाला आहे किंवा नाही, याबाबतची माहिती केवळ अर्ध्या तासात समजणार आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुणे शहरातील करोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता. स्थायी समिती मार्फत 1 लाख रॅपिड अँटिजेन टेस्ट किट खरेदी करण्याचा निर्णय घेतला गेला. या एका किटची किंमत 450 रुपये असून एखादा व्यक्ती बाधित असल्यास, त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क व्यक्तिच्या तपासण्या करण्यास अधिक फायदेशीर ठरणार आहे.

यापुर्वी एखाद्याचे रिपोर्ट येण्यास साधारण दोन दिवसांचा कालावधी लागत होता. आता या किटच्या माध्यमातुन केवळ अर्ध्या तासात रिपोर्ट मिळणार आहे. यामुळे बाधित रुग्णावर तातडीने उपचार होण्यास मदत होणार आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, शहरातील खासगी रुग्णालयामध्ये देखील, या किटचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 2:36 pm

Web Title: corona test in half an hour rapid antigen test kit available at pune msr 87 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 जगद्गुरू तुकोबाराय यांच्या पादुका पंढरीला घेऊन निघाली सजलेली ‘लालपरी’
2 शहरासह जिल्ह्य़ात नवी ३२१ महा-ई-सेवा केंद्रे
3 सचित्र ‘विष्णू अवतार’ हस्तलिखिताची प्रत उपलब्ध
Just Now!
X