पुणे : करोना संसर्ग वाढत असल्यामुळे रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांकडून धावपळ सुरू झाली आहे. त्यातूनच महापालिके ने सुरू के लेल्या मदत कक्षातील दूरध्वनी क्रमांकावर दररोज सरासरी २ हजार ३०० दूरध्वनी येत आहेत. यातील अवघ्या ३० टक्के  रुग्णांनाच महापालिके च्या रुग्णालयात खाटा मिळत असल्याचे चित्र आहे.

करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तीव्र लक्षणांबरोबरच सौम्य लक्षणे असलेले रुग्णही मोठ्या संख्येने वाढत आहेत. सौम्य लक्षणे असलेले रुग्ण गृहविलगीकरणात किं वा महापालिके च्या करोना काळजी के ंद्रात उपचारासाठी दाखल होत आहेत. तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना मात्र उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे. सध्या संसर्ग वाढल्यामुळे खासगी आणि महापालिके च्या रुग्णालयात खाटा उपलब्ध होऊ शकत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना खाटा मिळविण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे.

महापालिके ने रुग्णांच्या सेवेसाठी मदत कक्ष सुरू के ला आहे. हा कक्ष चोवीस तास कार्यान्वित असून त्यासाठी चार स्वतंत्र दूरध्वनी कार्यान्वित करण्यात आले आहेत. मात्र दिवसागणिक खाटांची कमतरता जाणवत असल्यामुळे मदत कक्षाकडे येणाऱ्या दूरध्वनींची संख्याही वाढली आहे. त्यामुळे महापालिके ने आता दहा स्वतंत्र लाइन (दूरध्वनी) कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दिवसाला साधारणपणे २ हजार ३०० दूरध्वनी कक्षाकडे येत आहेत. यासंदर्भात बोलताना महापालिके च्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख राहुल जगताप म्हणाले की, मोठ्या संख्येने दूरध्वनी येत असून दूरध्वनी व्यस्त रहात आहेत. दूरध्वनीनंतर खाटांची माहिती घेणे, प्राणवायू सुविधा असलेल्या खाटा किं वा कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटा हव्यात, याची माहिती घेणे, त्याबाबतची छाननी करणे, माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना देणे यामध्ये पंधरा मिनिटांचा कालावधी जात आहे. दरम्यान,  महापालिके ने या कक्षासाठी मनुष्यबळ आणि अन्य साधनसामुग्री वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका प्रशासनाने ०२०-२५५०२१०६, २५५०२१०७, ०२०-२५५०२१०८, ०२०-२५५०२१०९/२११०,२१११,२११८, २११५ अशी दूरध्वनी सेवा नव्याने सुरू के ली आहे. यातील दोन दूरध्वनींद्वारे रुग्णांच्या नातेवाइकांना खाटा उपलब्ध झाल्याचे कळविण्यासाठी वापरण्यात येणार आहे. सध्या या कक्षातील दूरध्वनीही व्यस्त लागत असल्यामुळे नव्याने दूरध्वनी क्रमांक वाढविण्यात आले आहेत.