राज्यात करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भातील शहरांमध्येही करोनाबाधितांची संख्या दररोज मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आता अधिक कडक भूमिका घेतली जात आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी नवे आदेश काढले आहेत. त्यानुसार आता पुण्यात मास्क न घालता पहिल्यांदा आढळणाऱ्यास ५०० रुपचे दंड व तोच व्यक्ती पुन्हा जर मास्क न घालता आढळला तर त्याच्याकडून १ हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.

कोविड -१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने पारीत केलेले आदेश, निर्देश, एओपी इत्यादींचे प्रभावी अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सही, शिक्क्यानिशी परिपत्रक काढण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली १६ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमेवत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्य देण्यात आलेल्या सूचनांच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यात कार्यवाही करण्याबाबत आदेशित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचाय समिती, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रातील सर्व मंगल कार्यालये, हॉल, लॉन्स, कोचिंग क्लासेस, खासगी शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा/ विद्यालय, महाविद्यालय, नाट्यगृह, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, मॉल्स, धार्मिक स्थळे, उद्याने व इतर गर्दी होणारी स्थळे या ठिकाणी वेळोवेळी अचानक भेट देऊन तपासणी करावी.

केरळहून पुण्यात येणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य

या ठिकाणी प्रमाणीत कार्यप्रणालीमधील मर्यादेपेक्षा जास्त संख्येत लोक उपस्थित असतील, उपस्थित लोकांनी चेहऱ्यावर मास्कर परिधान केलेलं नसेल, हँड सॅनिटायझरची उचित व्यवस्था नसेल तर त्यांना प्रथम नटीस देऊन उचित दंड आकारावा, नोटीस देताना पुढील तपासणीत हीच परिस्थिती राहिली तर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट उल्लेख करावा. तसेच, दुसऱ्या वेळेस जर अशीच परिस्थिती राहिली तर सदर प्रतिष्ठान १५ दिवसांसाठी सील करण्याची कार्यवाही करावी, अथवा प्रतिष्ठानावर पोलीस विभागाने गुन्हा दाखल करावा.

Coronavirus : पुण्यात पुन्हा लॉकडाउन होणार का?; महापौर मोहोळ म्हणतात…

तसेच, सार्वजनिक ठिकाणी नाक व तोंडावर मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीवर प्रथमवेळी ५०० रुपये व पुन्हा आढळल्यास १ हजार रुपये दंड आकारावा. सर्व हॉटेल, रेस्टॉरंट-उपहारगृहे, बॅक्वेट हॉल इत्यादी ठिकाणी नागरिकांना संचार करताना मास्क व सॅनिटायझर वापर करणे बंधनकारक राहील. गर्दी होणारे कोणतेही खासगी अथवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी संबंधित पोलीस स्टेशनमधून रितसर परवानगी प्राप्त करुन घेणे अनिवार्य राहील, आदी सूचना करणयात आलेल्या आहेत.