दिल्लीमधील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड शहरातील काही व्यक्ती सहभागी झाले होते. पैकी, २३ संशयितांना पोलिसांनी आणि आरोग्य विभागाने त्यांचा शोध घेऊन रुग्णालयात दाखल केल आहे. पैकी, दोन जनांचे अहवाल हे अगोदरच करोना पॉजीटिव्ह आले असून आज आणखी एका व्यक्तीचा अहवाल पॉजीटिव्ह आलेला आहे. दरम्यान, या करोना पॉजीटिव्ह व्यक्तीचे अवघे कुटुंब फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील काही व्यक्ती दिल्ली मधील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर ते शहरात दाखल झाले असून २३ संशयितांना महानगर पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या काही नातेवाईकांना देखील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय. दरम्यान, दोन जणांचे रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आलेले होते. त्यात आज आणखी एकाची भर पडली आहे. गंभीर बाब म्हणजे संबंधित व्यक्तीच कुटुंब हे सध्या बेपत्ता असून त्यांचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बधितांचा एकूण आकडा १५ वर पोहचला असून ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकाचा पहिला निगेटिव्ह अहवाल आला असून उद्या (शनिवारी) ही तसाच अहवाल असल्यास त्याला डिस्चार्ज देण्यात येणार आहे.