News Flash

कॉलसेंटरचालकाची २७ लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघाविरुद्ध गुन्हा

कॉलसेंटर चालकाने केलेल्या कामाचा मोबदला न देता २७ लाख ६० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एका कंपनीच्या संचालकांविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

राज्यातील इतर भागांप्रमाणेच रायगडातही वेगवेगळ्या योजनांची प्रलोभने दाखवून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.

कॉलसेंटर चालकाने केलेल्या कामाचा मोबदला न देता २७ लाख ६० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एका कंपनीच्या संचालकांविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी हेअर रिग्रोथ सिरम लि.चे संचालक नवीन शंकर आणि विपनन अधिकारी तेजस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमितेश आयटी सव्र्हिसेसचे संचालक अमितेश देशमुख (वय ३५, रा. राजयोग सोसायटी, धनकवडी ) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. स्वारगेट येथील वेगा सेंटर या व्यापारी संकुलात देशमुख यांचे कॉलसेंटर आहे. गेल्यावर्षी नवीन शंकर आणि तेजस यांनी कंपनीच्या उत्पादनांची जाहिरात आणि विक्रीचे काम देशमुख यांना दिले. त्यासाठी देशमुख यांनी ७० ते ७५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली.
देशमुख यांनी या कामापोटी कर्मचाऱ्यांना दररोज सहाशे ते साडेसहाशे रुपये मोबदला दिला. या कामापोटी देशमुख यांना आरोपींकडून २७ लाख ६० हजार रुपये देणे होते. कामाचा मोबदला मिळवण्यासाठी देशमुख यांनी पाठपुरावा केला. मात्र, आरोपींनी त्यांना पैसे दिले नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पलांडे तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2016 2:20 am

Web Title: crime in cheating case
टॅग : Cheating
Next Stories
1 पक्षहितापेक्षा देशहिताला प्राधान्य हेच शरद पवार यांचे मोठेपण- विजय केळकर
2 आयसिसचा प्रभाव राज्यात वाढतोय
3 आमची भाजी खरेदी आठवडी बाजारातच..
Just Now!
X