News Flash

एकविरा मंदिरात भाविकांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंग फज्जा

करोना अजून संपलेला नाही त्यामुळे भाविकांनी स्वतःसह इतरांची काळजी घ्यावी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह  ठाकरे कुटुंब आणि कोळी बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या एकविरा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंग चा फज्जा उडल्याचं चित्र आहे. एकीकडे प्रशासनाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तींसह मंदिर खुलं करण्याची परवानगी ठाकरे सरकारने दिली आहे. परंतु आता कार्ला येथील एकविरा देवीच्या मंदिरात मात्र गर्दी झाली असून सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला आहे.

गेल्या आठ महिन्यांपासून महाराष्ट्रातील मंदिर बंद होती. मार्च महिन्यात करोनाने शिरकाव केला आणि शासनाने लॉकडाउन घोषित केले, त्याच बरोबर कडक निर्बंध लागू करत मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय देखील सरकारला घ्यावा लागला. दरम्यान काही दिवसांपासून महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती सुधारत असून करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात सोमवार पासून मंदिर खुली करण्यात आली असून मंदिरांमध्ये गर्दी होत असल्याचं चित्र आहे.

लोणावळा येथील एकविरा देवीच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली असून सोशल डिस्टन्सिंग मात्र फज्जा उडाला आहे. प्रशासनाने अटी आणि शर्थींमध्ये करोनाची नियमावली पाळण्याचे आवाहन मंदिर प्रशासनासह भाविकांना केले होते. परंतु आजचे चित्र पाहिल्यानंतर ते पाळले जात नसल्याचं दिसत आहे. देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भविकांमध्ये काही फुटांचं अंतर असणंआवश्यक आहे. मात्र, गर्दी झाल्याने भाविक एकमेकांच्या अगदी जवळ आल्याचं स्पष्ट पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकीकडे करोना अजून संपला नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सांगत असताना दुसरेकडे मात्र नियमांची पायमल्ली केली जात आहे. सर्वधर्मीय भाविकांनी देखील स्वतः सह इतरांची काळजी घ्यावी अन्यथा याचे दुसऱ्या लाटेत रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 5:41 pm

Web Title: crowd of devotees at ekvira temple no social distancing at temple scj 81 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पिंपरीत सुलभ शौचालयाच्या हौदात सापडली मानवी कवटी आणि हाडं, पोलीसही चक्रावले
2 पुण्यात दिवसभरात १३७, पिंपरी-चिंचवडमध्ये ९३ करोनाबाधितांची नोंद
3 आळंदी-देहूत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
Just Now!
X