करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आज, शनिवारपासून (३ एप्रिल) सात दिवस पुणे शहरासह जिल्ह््यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय शुक्रवार घेण्यात आला.

पुढील सात दिवस पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस गाड्या बंद ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून उपाहारगृह, रेस्टॉरंट्स, मद्यालये, चित्रपटगृहे, धार्मिक स्थळेही बंद राहणार आहेत. मात्र, उपाहारगृहामधून पार्सल सेवा रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

करोना सद्य:स्थितीचा आढावा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह््याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्तालयात घेण्यात आला. या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. बैठकीनंतर याबाबत माहिती देताना विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, ‘रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शनिवापासून सात दिवस सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुढील सात दिवस ‘पीएमपी’ची बस सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळून इतरांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, एखादा उद्योग, कं पनीने कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी बसगाड्यांची मागणी के ल्यास त्यांना भाडे तत्त्वावर गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील.’ पुढील शुक्रवारी (९ एप्रिल) पालकमंत्री पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेऊन परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेण्यात येतील, असेही राव यांनी स्पष्ट केले.

महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, वंदना चव्हाण, अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे आदी या वेळी उपस्थित होते.

एसटी सेवा, मंडई सुरू

शहर आणि जिल्ह््यात बाहेरगावांहून अनेक नागरिक येत असतात. त्यांना त्रास होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठवडा बाजाराच्या ठिकाणी गर्दी होत असल्याने ते बंद के ले जाणार आहेत. मात्र, शहरी भागात मंडई, भाजीपाला केंद्र सुरू राहणार आहेत. या ठिकाणी निर्बंधांचे पालन होण्यासाठी महापालिके ने व्यवस्था करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

निर्बंध असे…

* उपाहारगृहे, रेस्टॉरंट,

मद्यालये, चित्रपटगृहे, मॉल आणि धार्मिक स्थळे बंद

* नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून हॉटेलमधून पार्सल सेवा

* पुणे परिवहन सेवेच्या बस गाड्यांची वाहतूक बंद

* पुढील सात दिवस राजकीय, सांस्कृतिक, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी

* विवाह सोहळ्यासाठी ५०, तर अंत्यविधीसाठी २० लोकांच्या उपस्थितीचे बंधन.

शाळा-महाविद्यालये बंद

शाळा, महाविद्यालये ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. मात्र, दहावी, बारावी आणि राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत.