कॉसमॉस बँकेचा सव्‍‌र्हर हॅक करून ९४ कोटींची रोकड लूटप्रकरणात सायबर गुन्हे शाखेकडून मुंबईतूनआणखी एकाला अटक करण्यात आली. विरार आणि भिवंडीतून दोघांना शुक्रवारी अटक

करण्यात आली. कॉसमॉस सायबर हल्लाप्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली. मुंबईतून अटक करण्यात आलेल्या  आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. आर. जाधव यांनी २४ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

pragya singh thakur
Malegaon Blast Case : “२५ एप्रिलला हजर रहा, अन्यथा..”, न्यायालयाने प्रज्ञा सिंह ठाकूर यांना काय सांगितलं?
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Rameshwaram Cafe Bomb Blast Case
रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाच्या सूत्रधारासह एकाला अटक; एनआयएची मोठी कारवाई
Brothers Arrested in for more than 12 Crore Online Ticket Scam of Tadoba Andhari Tiger Reserve
ताडोबा ऑनलाईन तिकीट घोटाळाप्रकरणी ठाकूर बंधुंना अटक; १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

अँथोनी ऑगस्टीन (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी यापूर्वी नरेश लक्ष्मीनारायण महाराणा (वय ३४, सध्या रा. विरार, मूळ रा. ओरिसा), मोहंमद सईद इक्बाल हुसेन जाफरी ऊर्फ अली (वय ३०, रा. भिवंडी) शेख मोहम्मद अब्दुल जब्बार (वय २८, रा. मिर्झा कॉलनी, औरंगाबाद) आणि महेश साहेबराव राठोड (वय २२, रा. धावरीतांडा, नांदेड) फहिम मेहफुज शेख (वय २७, रा. नुरानी कॉम्प्लेक्स, भिवंडी) आणि फहिम अझीम खान (वय ३०, रा. आझादनगर, औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली होती.  मुंबई, इंदूर, कोल्हापूर येथील एटीएम केंद्रात मिळालेले सीसीटीव्ही चित्रीकरण तपासकामी ताब्यात घेण्यात आले होते. चित्रीक रणाद्वारे आरोपींचा माग काढण्यात येत होता. आरोपी ऑगस्टीन, महाराणा,अली, शेख, राठोड आणि खान यांनी कोल्हापुरातून पैसे काढण्यासाठी ९५ बनावट डेबिट कार्डचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणात शनिवारी अटक केलेल्या ऑगस्टीनला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात येत आहे. बनावट डेबिट कार्ड तयार करण्यासाठी बँकेतील कोणी डाटा दिला का, याबाबतची माहिती घेण्यात येत आहे.

एकंदरच हा गुन्हा नियोजनबद्ध रीतीने करण्यात आला आहे. या दृष्टीने तपास करण्यात येत असून आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील अ‍ॅड. चैत्राली पणशीकर यांनी केली.