News Flash

फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैद्याची येरवडा कारागृहात आत्महत्या

या आरोपीपीने पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केली होती.

प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील फाशीची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. जलसिंह पांचाल (३८) असे त्याचे नाव आहे. पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती.
उत्तर प्रदेशमधील जलसिंह पांचाल याने तीन वर्षांपूर्वी एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केली होती. त्याने केलेल्या अमानवी गुन्ह्याबद्दल पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती.

२२ सप्टेंबर २०१६ ला शिक्षा सुनावल्यानंतर पांचालची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. पांचालने शुक्रवारी सकाळी कारागृहातील कोठडीत गळफास लावून घेतला. कारागृहातील या आत्महत्येच्या घटनेमुळे प्रशासनामध्ये खळबळ माजली असून या घटनेची चौकशी करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:46 pm

Web Title: death sentence convict committed suicide by hanging himself in yerawada central jail
Next Stories
1 नागरी सहकारी बँकांबाबत ४८ तासांत निर्णय घ्या; अन्यथा बँका बंद
2 घरांच्या किमती नव्हे, कर्जाचे व्याजदर कमी होतील
3 पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीचा बाजार ‘थंड’?
Just Now!
X