स्मृती इराणी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियाना’च्या माध्यमातून (रुसा) डिजिटल वर्ग आणि ई लर्निग साहित्य निर्मिती केंद्र उभारण्यात आले आहे. जगभरातील तज्ज्ञांची व्याख्याने आणि साहित्य या सुविधेमुळे विद्यार्थ्यांसाठी सहज उपलब्ध होणार आहेत.

रुसा हे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरू केलेले अभियान आहे. त्या अंतर्गत पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेच्या निकषावर दहा राज्यांची निवड करण्यात आली. या अभियानांतर्गत विद्यापीठाने डिजिटल क्लासरूम आणि ई-लर्निग साहित्य निर्मिती केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.

डिजिटल क्लासरूममुळे जगभरातील अनेक तज्ज्ञ, पूरक साहित्य हे विद्यार्थ्यांना सहजपणे उपलब्ध होणार आहे. वर्गातील चर्चाची नोंदही डिजिटल स्वरूपात होणार आहे. थ्रिडी व आकृत्या वर्गात दाखवता येत असल्यामुळे शिक्षकांनाही विषय समजावून देणे सोपे होणार आहे. या वर्गात इंटरअ‍ॅक्टिव्ह डय़ूएल बोर्डही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपापसात संवाद साधणेही शक्य होणार आहे. आरोग्यविज्ञान, सामाजिक शाष्टद्धr(२२९ो, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी विद्याशाखांबाबत जवळपास २०० तासांची माहिती व ऑनलाईन अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात येणार आहे.

रुसाअंतर्गत निर्माण झालेल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन शुक्रवारी ३ जूनला सकाळी ११ वाजता होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. राज्याच्या वतीने पुणे विद्यापीठाचा डिजिटल वर्गाचा आणि ई-साहित्य निर्मितीचा प्रकल्प सादर करण्यात आला असून त्याचे उद्घाटन या समारंभात होणार आहे, अशी माहिती रुसाच्या राज्य प्रकल्प संचालक मनीषा वर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे उपस्थित होते. या निमित्ताने विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रवींद्र वायकर, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आदी उपस्थित राहणार आहेत.