तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत गुंड गजा मारणे याने मिरवणुक काढली होती. या मिरवणुकीला भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी मदत केल्याची माहिती समोर आल्याने, त्यांना गुन्हे शाखेने अटक केली होती. मात्र, शिवाजी नगर न्यायालयाने २५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे. तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत गुंड गजा मारणे मिरवणूक काढली. या मिरवणुकीत जवळपास तीनशेहून अधिक चार चाकी वाहने सहभागी झाली होती. या मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, राज्यभरात एकच चर्चा सुरू झाली. त्यानंतर तळोजा ते पुण्या पर्यंत येणार्‍या पोलिस स्टेशनमध्ये गजा मारणे आणि सहभागी झालेल्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील काही आलिशान गाड्या देखील जप्त करण्यात आल्या. त्याच दरम्यान गजा मारणेला अटक करून येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यानंतर अनेक मोठ्या लोकांची नावे गजा मारणेच्या मिरवणुकीमध्ये समोर आली आहेत. आता तर थेट भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांच्यावरच गजा मारणेला मिरवणुकी करिता मदत केल्या प्रकरणी आज गुन्हे शाखेने अटक केली होती. यामुळे शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

गजालाही फिल्मी स्टाइल अटक झालेली

खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणे याची तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांवर माध्यम व सामाजिक स्तरातून टीकेची झोड उठली. त्यानंतर आपल्याला अटक होणार हे लक्षात आल्यानंतर गजा मारणे पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता. सहा मार्च रोजी गजा मारणे गाडीतून मेढा येथे आल्याची माहिती मिळताच गजा मारणे असल्याची खात्री पटताच त्याला पोलिसांना शरण येण्यास सांगण्यात आले. यानंतर त्याला फिल्मी स्टाईलने त्याला पकडण्यात आले. त्याला नंतर पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex bjp mp sanjay kakade arrested in gaja marne case svk 88 scsg
First published on: 21-04-2021 at 14:05 IST