15 October 2019

News Flash

बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजला आग

आग नेमकी कशामुळे लागली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही

पुण्यातील बुधवार पेठ भागात असलेल्या श्रीकृष्ण टॉकीजला आग लागल्याची घटना आज संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत
टॉकीजचा भाग पूर्णपणे जळाला आहे अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेमधील श्रीकृष्ण टॉकीज हे गेल्या काही महिन्यापासून बंद होते. आज संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. या आगीच्या घटनेत टॉकीज मधील आतील भाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या टॉकीजला आग लागण्याचे कारण काय ते स्पष्ट झालेले नाही असेही सांगण्यात आले.

 

First Published on January 10, 2019 7:33 pm

Web Title: fire at shreekrushna talkies pune