पुण्यातील येरवडा कारागृहातील रात्री पाळी झाल्यावर घरी जाण्यासाठी निघालेल्या उपनिरीक्षकावर गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या गोळीबारात उपनिरीक्षक मोहन पाटील बचावले असून त्यांच्यावर गोळीबार कोणी केला, याचा तपास सुरु आहे.
उपनिरीक्षक मोहन पाटील हे येरवडा कारागृहात तैनात आहेत. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास रात्र पाळी संपवून मोहन पाटील घरी जाण्यासाठी निघाले. यादरम्यान कारागृहाबाहेर दोन अज्ञात व्यक्तींनी मोहन पाटील यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी दोन गोळ्या झाडल्या. सुदैवाने हल्लेखोरांचा नेम चुकल्याने पाटील यातून बचावले आहेत. हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांनी या आधारे तपासाला सुरुवात केली आहे. गोळीबाराच्या घटनेने येरवडा कारागृह परिसरात खळबळ उडाली असून तुरुंगाच्या सुरक्षेचा प्रश्नही चर्चेत आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 6, 2018 11:24 am