पुणे-बंगळुरू महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणावर सोमवारी पहाटेपासून पाच अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर १० जण जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये पोलिसांच्या गाडीचाही समावेश आहे. एकाच दिवशी झालेल्या अपघातामुळे सोमवारला अपघातावार अलेत म्हणावं लागेल.

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज बोगद्यातून आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास Mh 12 pq 8736 या क्रमांकाचा दारूची वाहतूक करणारा ट्रक जात होता. हा ट्रक भूमकर पूलावर येताच मागून येणार्‍या Mh 18 aa 6681 ला जोरदार धडक दिली. या घटनेत मागील ट्रकचा चेंदामेंदा झाला होता. या अपघाता ट्रकमधील दोघांचा जागीचा मृत्यू झाला. जखमी दोघांना उपचारासाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणाहून काही अंतारावर सकाळी एक आयशर पलटी झाला असून त्यामधील दोघे जण गंभीर जखणी झाले आहेत.

वाकड येथील पुलावर पहाटेच्या सुमारास खासगी बसला झालेल्या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यातील जखमींवर औंध येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तसेच नवले पुलावर एक कंटेनर चालकाचं नियमंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला आहे. कंटेनरनं चार चाकी वाहनाला आणि रिक्षाला जोरदार धडक दिली. या घटनेत रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दिवसभरात पुण्यात अपघात घडत होते. याथील एका घटनास्थळी निघालेल्या एका पोलिसाच्या गाडीला अपघात झाल्याचेही वृत्त आहे. आज दिवसभरात पुण्यात पाच अपघाताच्या घटना घडल्या आहे. यामुळे पुणेकरांच्या दिवसाची सुरुवात अपघाताने घडली आहे. या घटनांमुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावं लागत आहे.