03 June 2020

News Flash

Coronavirus: पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाबाधित व्यक्तीचा पोलीस ठाण्यात संचार

पोलीस ठाणे निर्जंतुकिकरण केले असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस ठाण्यात करोनाबाधित व्यक्तीने मुक्त संचार केल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. त्यानंतर संबंधित पोलीस ठाणे निर्जंतुक करण्यात आले असून योग्य ती काळजी घेतली जात आहे. मात्र, त्यावेळी करोनाबाधित असल्याचे संबंधित व्यक्तीलाही माहिती नसल्याने नकळत तो पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.

तीनच दिवसांपूर्वी एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया केलेला रुग्ण हा करनोबाधित आढळला होता. त्यानंतर तेथील डॉक्टरांसह ऐकून ९२ जणांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. सुदैवाने सर्वांचे निगेटिव्ह रिपोर्ट आले होते. त्या घटनेनंतर शहरात ही गंभीर बाब उघड झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या २४ तासांत दोन करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यांपैकी, एका रुग्णाचे पिंपरी-चिंचवड शहरात चिकनचे दुकान आहे. हीच व्यक्ती आपलं दुकान सुरु ठेवण्याबाबत परवानगी घेण्यासाठी एका पोलीस ठाण्यात गेली होती. दोन दिवसांत त्यानं दोन ते तीन वेळेस या पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यानंतर बुधवारी रात्री तो करोनाबाधित असल्याचं निष्पन्न झालं आणि पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं.

दरम्यान, ही व्यक्ती कोणाच्या संपर्कात आला होती का? याचा शोध घेणं गरजेचं असून संबंधितांना क्वारंटाइन होण भाग पडणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 3:34 pm

Web Title: free moving of corona patient in police station of pimpri chinchwad aau 85 kjp 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 coronavirus : लॉकडाउन तोडण्यात पुणेकर महाराष्ट्रात अव्वल
2 करोनाचा विळखा; बारामतीत एकाचा मृत्यू, पुण्यातील मृतांचा आकडा २०
3 Coronavirus lockdown : टाळेबंदी भागांत कडक निर्बंध
Just Now!
X