गो. बं. देगलूरकर (मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक)

विविध ग्रंथांच्या वाचनाचा उपयोग मला पुरातत्त्वशास्त्र व मूíतशास्त्राचा अभ्यास करताना झाला. निराकार, आकार, नराकार, सुराकार, विश्वाकार आणि तत्त्वाकार हे मूíतशास्त्रातील टप्पे मी आज प्रदीर्घ अभ्यासाअंती समजू शकलो, ते केवळ वाचनाची ओढ आणि शोध भावनेमुळेच. पुरातत्त्व विषयातील मंदिर, स्थापत्य आणि मूर्ती हे माझे आवडते विषय. नागपूरमधील मांढळ या गावी उत्खननात १० ते १२ दुर्मिळ आणि वेगळ्या प्रकारच्या मूर्ती सापडल्या. या मूर्ती कोणाच्या आहेत, कोणत्या काळातील आहेत, याची उत्कंठा वाढली आणि खोलवर जाऊन मूíतशास्त्राविषयी विचार करण्यास सुरुवात झाली.

Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!
Human evolution explained
विश्लेषण: केसांमधील उवांचा आणि माणसाच्या अंग झाकण्याचा काय संबंध? उत्क्रांतीचा इतिहास व नवे संशोधन काय सांगते?

खरं तर मूर्तिशास्त्राची वाटचाल कशी झाली, मूर्तिशास्त्र म्हणजे काय हे शोधण्याची आवड आणि उत्कंठा नांदेडमधील देगलूर गावी असलेल्या आमच्या चुलत्यांच्या घरी लागली. आमचे एकत्र कुटुंब होते. त्या वेळी त्यांच्याकडे असलेल्या संग्रहातील पुस्तकांचा मुक्त वापर मी करीत असे. शाळेतील क्रमिक पुस्तके सोडली, तर त्यांच्याकडे असलेली पुस्तकेच आमच्यासाठी वाचनीय. नाथमाधवांच्या कादंबऱ्या वाचून मी इतिहासाकडे वळालो आणि त्या ग्रंथांचा उपयोग मला पुरातत्त्वशास्त्र व मूíतशास्त्राचा अभ्यास करताना झाला. निराकार, आकार, नराकार, सुराकार, विश्वाकार आणि तत्त्वाकार हे मूíतशास्त्रातील टप्पे मी आज प्रदीर्घ अभ्यासाअंती समजू शकलो, ते केवळ वाचनाची ओढ आणि शोध भावनेमुळेच.

शाळेमध्ये इयत्ता सातवी-आठवीत असताना ‘गोटय़ा’, ‘दाजी’ आणि साने गुरुजींची विविध पुस्तके वाचायला मिळाली. गोटय़ासारखी पुस्तके वाचताना बालपणाचा अनुभव आणि विनोदाचा निखळ आनंद मिळाला, तर साने गुरुजींच्या कथा वाचताना मन हेलावून जात असे. श्यामची आई पुस्तकातून अनेक संस्कारात्मक गोष्टी शिकायला मिळाल्या. हैदराबादमध्ये विवेकवíधनी शाळेत असताना शिक्षक इतिहास अशा पद्धतीने रंगवून सांगत, की आम्ही आपोआप त्याकडे आकर्षति होऊ लागलो. त्या वेळी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या पुस्तकाच्या प्रती बाहेर मिळत नव्हत्या. परंतु माझ्या मामाने एकांकरिता हे पुस्तक मिळविले. ते पुस्तक मी चोरुन वाचत असे आणि त्यातील गोष्टी मदानावर खेळण्यास गेलो की मित्रांना सांगत असे. त्या वेळी मी सांगितलेल्या गोष्टी ऐकून ते अवाक होत. त्यामुळे लोकांना अपूर्वाईच्या वाटणाऱ्या गोष्टी आपण अधिकाधिक जाणून घ्याव्या, याकरीता मी इतिहासाचा सखोल अभ्यास करू लागलो. हैदराबादमध्ये असल्याने काही उर्दू पुस्तकांचे वाचनही सुरू होते.

पुण्यामध्ये स. प. महाविद्यालयात शिकत असताना थॉमस हर्डी, चार्ल्स डिकन्स यांच्या पुस्तकांनी वेड लावले. शेक्सपियरची नाटके फारशी आवडत नव्हती, परंतु पुढे बौद्ध जातकांचा अभ्यास करताना शेक्सपियरच्या साहित्याचे केलेले वाचन अनेकदा उपयुक्त ठरले. ‘पण लक्षात कोण घेतो’, गड आला पण सिंह गेला’ अशा कादंबऱ्यांमुळे इतिहासाकडे वळण्याची प्रेरणा मिळाली. पुणे विद्यापीठातून बी.ए. आणि एम. ए. पदवीचे शिक्षण घेताना ‘शिवाजी द ग्रेट’ आणि युरोपियन इतिहासाविषयी अधिक जाणून घेतले. त्या वेळी इतिहास शिकविणारे शिक्षक केवळ बौद्धिक ज्ञान न देता इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा, हे समजून सांगत. त्यामुळे अवांतर वाचनाकडे ओढा आपोआप वाढत असे. स. प. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासापासून ते जपानच्या इतिहासापर्यंतची अनेक पुस्तके ढुंढाळली. त्या वेळी आंबिकर नावाचे ग्रंथपाल होते, त्यांनी मला आवश्यक अशी आवडती पुस्तके उपलब्ध करून देत नवी पुस्तके सुचविली. त्यामुळे माझ्या वाचनाला अधिक वाव मिळत गेला. तेथूनच खऱ्या अर्थाने वाचनालयात जाऊन पुस्तके वाचण्याचा माझा प्रवास सुरू झाला.

कालांतराने मी पुरातत्त्वशास्त्राकडे वळालो. शांताराम देव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. संपादन केली. प्राचीन मराठवाडय़ाचा सांस्कृतिक इतिहास हा माझ्या पीएच. डी. चा विषय होता. वेगवेगळ्या प्रकारची नाणी, शिलालेख, मंदिरे, मूर्ती, लेणी यांचा अभ्यास त्याकरिता गरजेचा होता. त्यामुळे अनेक प्राचीन व दुर्मीळ ग्रंथ वाचनात आले. देवसरांसोबत अनेक ठिकाणी मी उत्खननाच्या वेळी जात असे. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव मिळत गेला. पुरातत्त्व विषयातील मंदिर, स्थापत्य आणि मूर्ती हे माझे आवडते विषय. नागपूरमधील मांढळ या गावी उत्खननात १० ते १२ दुर्मिळ आणि वेगळ्या प्रकारच्या मूर्ती सापडल्या. या मूर्ती कोणाच्या आहेत, कोणत्या काळातील आहेत, याची उत्कंठा वाढली आणि खोलवर जाऊन मूíतशास्त्राविषयी विचार करण्यास सुरुवात झाली.

कोणत्याही मूर्तीचा अभ्यास करताना त्यामागील शास्त्राचा अभ्यास आवश्यक ठरला. समाजपरिवर्तन, समाजप्रबोधन आणि सामाजिक अभिसरण या गोष्टी मूíतशास्त्रामागे दडलेल्या आहेत. केवळ पूजा हा मूर्ती संवर्धनामागचा हेतू नसून त्यामागे अनेक शास्त्रीय कारणेसुद्धा आहेत. कोणार्क, गुजरात आणि काश्मीरसह देशाच्या विविध भागांतील प्रबोधनात्मक मूर्तीची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. मूíतशास्त्राचा अभ्यास हा विलक्षण आनंददायी असून मयमत, मानसार, विष्णुधर्मोत्तरपुराण, समरांगण सूत्रधार, शिल्पप्रकाश, अपराजित पृच्छा, चतुर्वर्गचिंतामणी अशी अनेक पुस्तके या शास्त्राची माहिती जाणून घेण्याकरिता मला उपयोगी पडली. याशिवाय महाकवी कालिदास, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या साहित्यातून मूíतशास्त्राचे अनेक दाखले आणि त्यामागील हेतू समजले. दरम्यान, टी. ए. गोपीनाथराव, जे. एन. बॅनर्जी, ग. ह. खरे, नि. पु. जोशी यांच्या पुस्तकांचे वाचन मी आवडीने करीत होतो.

[jwplayer yHhql4I1]

महाराष्ट्राच्या अनेक मंदिरातील देव-देवतांच्या मूर्तीचे रूपांतर किंवा अदलाबदल काही ना काही कारणाने झाली. त्यामागे काय कारणे असावीत, हे शोधण्यासाठी मी संवाद माध्यमाचा वापर करीत तेथील स्थानिकांशी बोलत असे. त्यासोबतच स्थानिक इतिहास सांगणारी पुस्तके संदर्भासाठी वापरे. यामुळे महाराष्ट्रातील १२ ते १५ मंदिराच्या मूर्ती बदलाचा रोमांचकारी प्रवास मी जाणून घेऊ शकलो. भारतासह परदेशात ज्या ज्या ठिकाणी मी गेलो, तेथील संग्रहालयांची भ्रमंती आवर्जून केली. तेथील ग्रंथालयांमध्ये जाणे प्रत्येक वेळी शक्य झाले नाही, परंतु स्थानिक पुस्तक विक्रेत्यांकडे जाऊन आवडत्या पुस्तकांची खरेदी मी करीत असे. माझा वाचनप्रवास सुरू असताना काही तरी लेखनही करावे, असे नेहमी वाटे. त्यामुळे ‘टेम्पल आíकटेक्चर अँड स्कल्पचर ऑफ महाराष्ट्र’ हे भारतातील महत्त्वाच्या मंदिर व मूर्तीवरील पुस्तक अवघ्या तीन महिन्यांत लिहून काढले. त्या वेळी मला नागपूर विद्यापीठाकडून डी. लिट. पदवी मिळाली. अनेकदा नागपूर आणि हैदराबाद येथील शासकीय ग्रंथालयांचा वापर मी करीत असे. याशिवाय पुण्यातील डेक्कन कॉलेज, भांडारकर इन्स्टिटय़ूट आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या ग्रंथालयाशी माझा जवळचा संबंध होता.

माझ्या बुकशेल्फमध्ये ज्ञानकोश, गणेशकोशासह विविध कोश तर आहेतच; सोबत कुमार स्वामी, कृष्णदेव, शिवराय मूर्ती यांची अनेक पुस्तके आहेत. भरप्पा यांची ‘आवरण’ ही कादंबरी मला विशेष भावली. जे पुस्तक मला आवडते, त्याच्या मी नेहमी दोन प्रती खरेदी करतो आणि एक प्रत जवळच्या व्यक्तीला वाचनासाठी देतो. मी जसे वाचतो, तसे इतरांनीही वाचावे, असे मला नेहमी वाटते. त्यामुळेच डेक्कन कॉलेजमध्ये कुलपती म्हणून कार्यरत असताना, जे विद्यार्थी किंवा शिक्षक ग्रंथालयाचा जास्तीत जास्त उपयोग करतात, अशांसाठी प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरू केला. त्यासोबतच जी नवी पुस्तके विद्यार्थी किंवा शिक्षक सुचवित असत, त्याची आवर्जून खरेदी ग्रंथालयाकरिता होत असे. त्याकाळात डिजिटलायझेशन करण्यास सुरुवात झाली होती. इतिहासाप्रमाणेच मूíतशास्त्रविषयी जाणून घेताना संतवाङ्मयाचे मला वेड लागले. केवळ पारायणाकरिता संतवाङ्मय नसून संतांनी समाजाला ज्ञान देण्यास त्याचा उपयोग केला. त्यामुळे ऐतिहासिक किंवा संत वाङ्मयाच्या ज्ञानभांडाराचा उपयोग आपणही समाज शिक्षणाकरिता करायला हवा.