18 September 2020

News Flash

..तर हे निलंबन खाते बनेल!

पाटबंधारे खात्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. सरकारने आवश्यक तिथे चौकशी केली आहे. प्रत्येक ठिकाणी चौकशी आणि निलंबन करत राहिलो तर हे निलंबन खाते होईल.

| February 27, 2015 04:27 am

पाटबंधारे खात्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. सरकारने आवश्यक तिथे चौकशी केली आहे. प्रत्येक ठिकाणी चौकशी आणि निलंबन करत राहिलो तर हे निलंबन खाते होईल, अशी टिप्पणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
खडकवासला प्रकल्पाच्या जुना मुठा कालव्याचे नूतनीकरण हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथे महाजन यांच्या उपस्थितीत झाले. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पाटबंधारे (जलसंपदा) विभाग बदनाम झाला आहे. त्यामुळेच मागचे सरकार गेले. हा विभाग मूठभर ठेकेदारांच्या हातात गेला होता. त्यामुळेच आताच्या सरकारने आधीची ७००-८०० कोटी रुपयांची कामे रद्द केली आहेत. आता या विभागात पारदर्शक कारभार आला आहे, असे महाजन यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2015 4:27 am

Web Title: girish mahajan contractor irrigation
Next Stories
1 निवृत्तीनंतरही अधिकारी विद्यापीठातच?
2 ‘नारायण पेठी’ बोलीच्या सर्वेक्षणाचे काम सुरू
3 अभिनेते अजय वढावकर यांचे निधन
Just Now!
X