News Flash

राष्ट्रवादीचे पिंपरी विद्यार्थी शहराध्यक्ष हर्षल ढोरे भाजपमध्ये

राष्ट्रवादीचे सांगवीत प्रशांत शितोळे यांची डोकेदुखी वाढणार आहे.

राष्ट्रवादीच्या पिंपरी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष हर्षल ढोरे यांच्यासह माजी उपमहापौर माई ढोरे यांचे चिरंजीव जवाहर ढोरे यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे सांगवीत प्रशांत शितोळे यांची डोकेदुखी वाढणार आहे.

ज्यांची घुसमट होत असेल, त्यांनी खुशाल पक्ष सोडावा, अशी भूमिका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी स्पष्ट केली आहे. तथापि, स्वत:ची राजकीय गणिते निश्चित झाल्याशिवाय कार्यकर्तेही भूमिका स्पष्ट करत नसल्याचे दिसून येत आहे. आमदार लक्ष्मण जगताप राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर राष्ट्रवादीने सांगवी-पिपळे गुरव भागातील नेतृत्वाची धुरा शितोळे यांच्या खांद्यावर दिली आहे. अलीकडेच पक्षाचे प्रवक्तेपदही शितोळे यांना देण्यात आले आहे. अजितदादांकडून शितोळे यांना बळ दिले जात असल्याने राष्ट्रवादीत राहण्यात काही अर्थ नसल्याची स्पष्ट जाणीव झालेल्या ढोरे यांनी अखेर भाजपची वाट धरल्याचे मानले जाते. सोमवारी शहराध्यक्ष जगताप यांच्या उपस्थितीत ढोरे बंधूंनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, काँग्रेस नगरसेविका जयश्री गावडे यांचे पती वसंतराव गावडे यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे गावडे परिवार कट्टर समर्थक मानला जातो. आगामी निवडणुकीत काँग्रेसची हमखास निवडून येणारी जागा म्हणून जयश्री गावडे यांच्याकडे पाहिले जात होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 12:05 am

Web Title: harshal dhore in bjp
Next Stories
1 पुण्यात गणपती विसर्जनासाठी खडकवासल्यातून नदीत पाणी सोडणार
2 BLOG : …त्यांनी पुणं कधी अनुभवलंच नाही!
3 साडेतीन दशकांची संगीत साधना
Just Now!
X