हेलिकॉप्टरमध्ये बसून हवाई चित्रण करणे शक्य नसले, तरी आता त्याच्यासारखेच ‘विहंगम’ दृश्य टिपणे आता शक्य बनले आहे. त्याच्यासाठी ‘एरियल फिल्मिंग डिव्हाइस’ हे उपकरण उपलब्ध झाले असून, पुण्यातही त्याचा वापर होऊ लागला आहे. पुण्यातील नरेंद्र नवले आणि अमित तक्ते या छायाचित्रकारांनी त्याचाच वापर करून आळंदी येथील संत ज्ञानेश्वरांच्या

हे छायाचित्र टिपण्यासाठी पुण्यातील नरेंद्र नवले आणि अमित तक्ते यांनी ‘एरियल फिल्मिंग डिव्हाइस’ हे वैशिष्टय़पूर्ण उपकरण वापरले आणि सुमारे ५० मीटरवरून हे छायाचित्र घेतले.

पालखीची सुंदर छायाचित्रे टिपली.
या कॅमेऱ्याबाबत नवले यांनी सांगितले, की पुण्यात वर्षांपासून या कॅमेऱ्याचा वापर केला जात आहे. विशेषत: उद्योगक्षेत्रात त्याला मागणी आहे. या उपकरणाला चार पंखे आहेत. त्याच्या खाली कॅमेरा जोडता

येतो. पंख्यांचा वापर करून हे उपकरण हवेत झेपावते. ते साधारणत: २०० मीटर उंचीपर्यंत पोहोचू शकते. त्याला जोडलेला कॅमेरा स्वयंचलित पद्धतीने चालवता येतो किंवा खालून ‘रिमोट कंट्रोल’ वापरून फोटो काढता येतात. या कॅमेऱ्याद्वारे फोटांबरोबरच चलचित्रण (व्हिडिओग्राफी) करणे शक्य आहे. आळंदी येथून सूर्योदयाच्या वेळी ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान झाले, तेव्हा सुमारे ५० मीटर उंचीवरून पालखीची छायाचित्रे घेण्यात आली आहेत, असेही नवले यांनी सांगितले.