राज्य मंडळाचा बारावीचा निकाल बुधवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार असून पुणे विभागीय मंडळाने विद्यार्थ्यांसाठी मदतक्रमांक सुरू केले आहेत.
राज्य मंडळाचा बारावीचा निकाल दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे, अनुत्तीर्ण झाल्यामुळे निराश झालेल्या विद्यार्थ्यांना समुदेशन करण्यासाठी पुणे विभागीय मंडळाने समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. २७ मे ते १ जून या कालावधीत विद्यार्थी समुपदेशकांशी संपर्क साधू शकतात. पुणे विभागीतल विद्यार्थी प्रा. बी. टी. गरुड (८६००५२५९०८), सोलापूर विभागातील विद्यार्थी प्रा. सुधीर खाडे (९४२०५४२६५४) आणि नगर विभागातील विद्यार्थी एस. एल. कानडे (९०२८०२७३५३) यांच्याशी संपर्क साधू शकतात.
निकालाबाबत काही अडचणी असल्यास मंडळाच्या (०२०-६५२९२३१७) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सचिवांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th May 2015 रोजी प्रकाशित
पुणे विभागातील विद्यार्थ्यांसाठी मदतक्रमांक
परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे, अनुत्तीर्ण झाल्यामुळे निराश झालेल्या विद्यार्थ्यांना समुदेशन करण्यासाठी पुणे विभागीय मंडळाने समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.
First published on: 27-05-2015 at 02:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hsc help line result