आपल्या सर्वांवर करोना आजाराचे संकट असून या आजाराचा परिणाम सर्व व्यवसायावर झाला आहे. त्याप्रमाणे आता फटका व्यवसायावर देखील होण्याची शक्यता आहे. करोना काळात राज्य सरकारने बंदी आणू नये. आजवर ज्या प्रकारे फटका विक्री करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारने परवानगी द्यावी. अशी मागणी पुणे फटका विक्री असोसिएशनचे दादासाहेब देवकर यांनी केली आहे. जर फटका विक्रीवर बंदी घातल्यास आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी भावना त्यांनी मांडली.

यावेळी दादासाहेब देवकर म्हणाले की, “मागील कित्येक वर्षापासुन आम्ही फटका विक्री करीत आहोत. यामधून कोट्यवधी रूपयांची उलाढाल होते. या काही दिवसांच्या व्यवसायाच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार मिळतो. मात्र यंदाच्या करोनामुळे लग्न सोहळे झाले नाहीत. त्यामुळे आमच्यासह इतर व्यवसायांनादेखील फटका बसला आहे. मात्र आता काही राज्यांनी फटका विक्रीवर बंदी घातली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने असा निर्णय घेऊन नये. आमचं सर्वकाही याच व्यवसायावर अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.”

तसेच ते पुढे म्हणाले की, फटका विक्रीवर बंदी आणल्यास अनेक व्यावसायिक कर्जबाजारी होतील आणि त्यामुळे आमच्यावर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने आमच्या व्यवसायाचा विचार करून, पूर्वीसारखा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.