सर्रास काँक्रिटीकरणामुळे झाडे पडण्याच्या घटनांमध्ये वाढ

पुणे : शहरातील गल्लीबोळांतील रस्त्यांसह अन्य प्रमुख रस्त्यांचे सर्रास झालेले काँक्रिटीकरण झाडांच्या ‘मुळांवर’ आल्याचे पुढे आले आहे. काँक्रिटीकरणांमुळे झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांची सर्वाधिक नोंद गेल्या दोन वर्षांत झाली आहे. झाडे पडण्यामागे सिमेंटचे रस्ते हेच प्रमुख कारण असल्याचे निरीक्षण महापालिके च्या उद्यान विभागाने नोंदविले आहे. गेल्या दोन वर्षांत २ हजार ४२१ झाडे पडण्याच्या घटना घडल्या.

तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे शहरात गेल्या दोन दिवसांपूर्वी झाडे पडण्याच्या ४० घटना घडल्या. अग्निशमन दलाकडील आकडेवारीनुसार झाडे पडण्याच्या घटनांमध्ये सन २०१५ पासून वाढ झाली आहे. शहरातील सुस्थितीतील रस्ते उखडून त्यांचे काँक्रिटीरकण करण्याचे पेव सध्या फु टले आहे. त्यामुळे गल्लीबोळासह बहुतांश रस्त्यांचे सर्व पक्षीय नगरसेवकांनी काँक्रिटीकरण के ले आहे.

सिमेंट रस्त्यांमुळे पर्यावरणाला बाधा होत असल्याची तक्रार सातत्याने पर्यावरणप्रेमींनी के ली आहे. मात्र आता महापालिके च्या उद्यान विभागानेही झाडे पडण्याला सिमेंट रस्ते कारणीभूत असल्याचे स्पष्ट के ले आहे. काँक्रिटीकरणामुळे झाडांच्या मुळांना तग धरण्यासाठी माती मिळत नाही. त्यामुळे झाडांचे आयुष्य कमी होत आहे, असे उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी सांगितले.

रस्त्याला लागून असलेल्या झाडांच्या परिसरातील काँक्रिटीकरण करण्यात येऊ नये, असे परिपत्रक उद्यान विभागाने काही वर्षांपूर्वी काढले होते. मात्र पथ विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. महापालिके च्या पथ विभागाने हा आक्षेप खोडून काढला आहे.

‘सिमेंटचे रस्त्यांमुळे झाडे पडतात, मात्र तेच प्रमुख कारण आहे, असे नाही. धोकादायक झाडांच्या फांद्या तोडताना त्या चुकीच्या पद्धतीने तोडल्या जातात. त्यामुळे पावसाळ्यात अशी झाडे पडतात. रस्त्यांचे विकसन करताना योग्य ती काळजी घेतली जाते. झाडांच्या मुळांना पुरेशी जागा मिळेल, यादृष्टीनेच रस्त्याची कामे के ली जातात,’ असे पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कु लकर्णी यांनी सांगितले.

नगरसेवकांकडून दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर रस्त्यांचे काँक्रिटीकरण के ले जाते. अस्तित्वातील, सुस्थितील रस्ते त्यासाठी उखडले जातात. दरवर्षी वॉर्डस्तरीय निधीतून जवळपास ३०० कोटींची उधळपट्टी के वळ काँक्रिटीकरणासाठी के ली जाते. सिमेंट रस्त्यांमुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असल्यामुळे आणि पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी तुंबण्याच्या घटना होत असल्याने महापालिके ने सिमेंट रस्ते न करण्याचे परिपत्रक काढले होते. मात्र त्यानंतरही सर्रास काँक्रिटीकरण होत आहे. या वर्षांतही शेकडो नगरसेवकांनी प्रभागातील गल्लीबोळातील रस्ते सिमेंटचे काढण्याचे प्रस्ताव मंजूर करून घेतले आहेत.