23 September 2020

News Flash

पिकांची माहिती आता मोबाइल अ‍ॅपद्वारे गोळा होणार

राज्यात कोणत्या पिकांची शेतकऱ्यांनी किती पेरणी केली, त्यातून किती उत्पादन होऊ  शकते.

(संग्रहित छायाचित्र)

पुण्यात आज प्रशिक्षण

पुणे : राज्यातील कोणत्या जिल्ह्य़ात कोणत्या पिकांची पेरणी झाली आहे, प्रत्यक्ष उत्पादन किती होणार आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे काही नुकसान होणार आहे का, याबाबतची वस्तुनिष्ठ माहिती गोळा करण्यासाठी आता मोबाइल अ‍ॅपची मदत घेण्यात येणार आहे. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने अत्याधुनिक पद्धतीने मोबाइल अ?ॅपद्वारे ई-पीक पाहणी केली जाईल. त्यासाठी जीपीएस प्रणालीचा वापर करून संबंधित पिकाचे छायाचित्र मोबाइल अ?ॅपवर अपलोड करण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यासाठी पुणे जिल्ह्य़ाची निवड करण्यात आली असून मंगळवारी बारामती तालुक्यात त्यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

राज्यात कोणत्या पिकांची शेतकऱ्यांनी किती पेरणी केली, त्यातून किती उत्पादन होऊ  शकते. तसेच कोणत्या भागातील पिकांचे दुष्काळ, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे, याबाबतची माहिती शासनाला प्राप्त व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाने मोबाइल अ‍ॅपद्वारे ‘ई-पीक पहाणी’ करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील आवश्यक प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

पुणे जिल्ह्य़ातील बारामती तालुक्यातील महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी तसेच शेतकऱ्यांना मंगळवारी (५ फेब्रुवारी) याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी जमाबंदी (भूमी अभिलेख) आणि कृषी आयुक्तालयाकडून नुकतीच एक प्रशिक्षण कार्यशाळाही घेण्यात आली.

कृषी आणि जमाबंदी आयुक्तालयाकडून ई-पीक पाहणी मोबाइल अ?ॅपच्या वापरासंबंधीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवारी (५ फेब्रुवारी) बारामतीमध्ये महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी विभागाकडून विशेष प्रशिक्षक नेमण्यात आले आहेत.

– रामदास जगताप, राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 2:56 am

Web Title: information about crops is now collected by mobile app
Next Stories
1  ‘वस्तू वाटप’ हवेच!
2 पुणे रेल्वे स्थानकांतील फलाटांची लांबी वाढणार
3 शहरबात : बेभरवशाची पीएमपी
Just Now!
X