News Flash

हडपसर परिसरातील नागरी वस्तीत बिबटय़ाचा वावर

हडपसरमधील साडेसतरानळी परिसरातील नागरी वस्तीमध्ये बिबटय़ाचा वावर आढळून आला आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, बिबटय़ाचा बंदोबस्त करण्याची वन विभागाकडे मागणी

पुणे : हडपसरमधील साडेसतरानळी परिसरातील नागरी वस्तीमध्ये बिबटय़ाचा वावर आढळून आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून बिबटय़ाचा परिसरात वावर असल्याने स्थानिक शेतकरी आणि रहिवासी भयभीत झाले आहेत. बिबटय़ाचे छायाचित्रही नागरिकांनी काढले असून बिबटय़ाचा ताडतीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी के ली आहे.

साडेसतरानळी परिसरात गेल्या तीन दिवासंपासून बिबटय़ाचा वावर असल्याचे स्थानिक नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आढळून आले आहे. त्यामुळे ही बाब त्यांनी हडपसरचे आमदार चेतन तुपे यांच्या निदर्शनास आणली. बिबटय़ाच्या वावर असलेल्या भागातील त्याच्या पायाच्या ठशांचे छायाचित्रही वन विभागाकडे देण्यात आले आहे. त्यानुसार तुपे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तुपे यांच्याबरोबर परिसराची पाहणी के ली. त्या वेळी या भागातील मोकाट श्वानांची संख्या कमी झाली आहे, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर अवघ्या काही तासांतच परिसरात फिरणारा बिबटय़ा एका प्रत्यक्षदर्शीच्या कॅ मेऱ्यामध्ये कै द झाला. त्यामुळे या परिसरात बिबटय़ाचा वावर असल्याचे स्पष्ट झाले.

गेल्या तीन दिवासांपासून बिबटय़ा परिसरात फिरत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बिबटय़ाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी. शेतात काम करत असताना शक्यतो खाली बसून काम करू नये आणि आवाजाद्वारे परिसर जागता ठेवावा, अशी सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांना केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 2:22 am

Web Title: leopards roam urban areas hadapsar ssh 93
Next Stories
1 ‘सर्व उत्तीर्ण अभियाना’तही ७५८ विद्यार्थी नापास
2 दहावीनंतरच्या करिअर वाटांसाठी…
3 विद्यार्थ्यांवर अतिरिक्त गुणांची खैरात
Just Now!
X