‘लोकसत्ता विश्लेषण’ उपक्रम १९ सप्टेंबरला पुण्यात
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर त्याबाबत सर्वसामान्यांना विविध प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची संधी पुणेकरांना ‘लोकसत्ता’चा खास उपक्रम असलेल्या ‘लोकसत्ता विश्लेषण’मध्ये मिळणार आहे. कोथरूडमधील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बालशिक्षण मंदिर सभागृहात १९ सप्टेंबरला संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सीए’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष अरुण गिरी, ‘अर्न्स्ट अॅण्ड यंग’चे भागीदार सागर शहा हे या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. १ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू झाला. त्याचे विविध परिणाम आता समोर येत आहेत. हे परिणाम नेमके काय आहेत? जीएसटीबाबत नागरिकांनी काही स्वप्ने पाहिली होती. काही अंदाज बांधले होते. ते वास्तवात आले का? असे नानाविध प्रश्न आहेत. त्याची नेमकी उत्तरे या कार्यक्रमातून मिळू शकणार आहेत. जीएसटीनंतरच्या अर्थकारणाचा खरा अर्थही जाणून घेता येणार आहे.
कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य आहे. मात्र, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असतील. टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड आणि केसरी (वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल कंपनी) हे या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत.
- केव्हा – दिनांक, मंगळवार, १९ सप्टेंबर २०१७,
- वेळ : सायंकाळी ६ वाजता.
- कुठे? स्थळ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे.