महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत राज्यातील तब्बल ३९ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, विद्यार्थी शिक्षण मंडळाने दिलेल्या साईट्सवर जाऊन आपला निकाल बघू शकतात.
दहावीच्याही निकालाची टक्केवारी घसरली, कोकण विभाग ठरला अव्वल
विद्यार्थ्यांना येत्या १५ जूनला दुपारी ३ वाजता त्यांच्या शाळेमध्ये गुणपत्रिका मिळणार आहे. त्याचबरोबर कलचाचणीचे निष्कर्षही विद्यार्थ्यांना निकालासोबत देण्यात येणार आहेत. राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला असून, या विभागातील ९६.५६ टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे
http://www.result.mkcl.org
http://www.maharashtraeducation.com
http://www.rediff.com/exams
http://maharashtra10knowyourresult.com
http://www.mahresult.nic.in – See more at: https://www.loksatta.com/mumbai/maharashtra-ssc-result-2016-declared-1247252/#sthash.4tUi5dcO.dpuf