पिंपरी च्या एच ए मैदानावर तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. त्याची ओळख पटू नये म्हणून त्याचा मृतदेह जाळण्यात आला. ही घटना पहाटे च्या सुमारास उघड झाली.अजय नागोसे अस खून झालेल्या १९ वर्षीय तरुणाचे नाव आहे तो एच.ए कंपनीच्या कॅन्टीनमध्ये कामाला होता. याप्रकरणी अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अजय हा एच.ए कंपनीच्या कॅन्टीन मध्ये कामाला होता. शनिवारी रात्री रात्रपाळी आहे असं त्याने वडिलांना फोनद्वारे सांगितलं होतं. त्यामुळे तो रात्रभर बाहेरच होता. दरम्यान आज सकाळी एच.ए मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी मुलं आली होती, त्यांना मृतदेह जळताना दिसला याची माहिती त्यांनी पिंपरी पोलिसांना दिली. अगोदर डोक्यात दगड घालून खून केला असून त्याचा मृतदेह जाळण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मृतदेहा शेजारी अजय चा मोबाईल सापडला असून त्याची ओळख पटलेली आहे.घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.