20 September 2019

News Flash

माझ्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी मुलाला सोबत नेले, गिरीश बापटांचा खुलासा

पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत दिली माहिती

जपान दौऱ्यावर असताना माझ्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी मी मुलगा गौरव याला सोबत घेऊन गेलो होतो. तो स्वतःच्या खर्चाने या दौऱ्यात सहभागी झाला होता, असा खुलासा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत केला.
बापटांच्या शासकीय जपान दौऱ्यात गौरव गिरीश बापट
गिरीश बापट यांच्या शासकीय जपान दौऱ्यात शासकीय अधिकाऱ्यांशिवाय गौरव गिरीश बापट आणि आणि बापट यांच्यासाठी जनसंपर्क व प्रसिद्धीचे काम करणारे सुनील माने यांचा समावेश झाल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला होता. त्याचबरोबर या दोघांना जपानच्या शासकीय दौऱ्यावर नेण्याचे कारण काय, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. लोकसत्तानेच यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर माझ्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी मी मुलाला जपानला घेऊन गेलो होतो. तो शासकीय खर्चाने नव्हे, तर स्वखर्चाने सोबत आला होता, असे गिरीश बापट यांनी स्पष्ट केले.

First Published on January 29, 2016 2:17 pm

Web Title: my son with me in japan tour for taking care of my health says girish bapat