News Flash

पिंपरीत नवमतदार नोंदणीसाठी मोहीम

तदार याद्यांमधील अन्य महत्त्वपूर्ण बदल करणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आणि आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर, िपपरी महापालिकेने नवमतदार नोंदणी मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार, एक जानेवारी २०१६ या दिवशी १८ वर्ष पूर्ण झालेल्या तरूणांची नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच, मतदार याद्यांमधील अन्य महत्त्वपूर्ण बदल करणार आहेत.

चिंचवड विधानसभेसाठी थेरगाव येथील महापालिका शाळा, िपपरी विधानसभेसाठी प्राधिकरणातील डॉ. हेडगेवार भवन आणि भोसरीसाठी नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे नावनोंदणीचे कार्यालय ठेवण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, मतदार याद्यांचे नूतनीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मतदारांनी आपले नाव यादीत आहे का, याची खात्री करून घ्यावी. या मोहिमेत मतदारांच्या घरांच्या पत्त्यांमधील बदल, दुबार नावे, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळता येणार आहेत, तशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांना कळवण्यात यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 4:30 am

Web Title: new voter registration in pimpri
Next Stories
1 समस्या मांडताना प्रकाशकांची एकी आवश्यक
2 आडत्यांचा संप मागे
3 टाटा मोटर्समधील वाद चिघळला
Just Now!
X