सासरकडील लोकांच्या छळाला कंटाळून नवविवाहित तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्वेनगर परिसरात शनिवारी ( ११ जून) ही घटना घडली.अश्विनी अमोल उभे असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरूणीचे नाव आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अमोल, दीर संतोष (दोघे रा. शाहू कॉलनी, कर्वेनगर)आणि त्याच्या नातेवाइकांविरूद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लता शिंदे (रा. धायरी फाटा) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनीचा विवाह अमोल उभे याच्यासोबत ६ मार्च रोजी झाला होता. विवाहानंतर अश्विनीला स्वयंपाक करता येत नाही तसेच घरकाम करता येत नाही, असे टोमणे मारण्यास पती अमोल, दीर संतोष आणि त्याच्या नातेवाइकांनी सुरूवात केली. तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरूवात केली.
छळाला कंटाळून अश्विनीने शनिवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिची आई लता यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती आणि दिराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक राऊत तपास करत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jun 2016 रोजी प्रकाशित
छळाला कंटाळून नवविवाहित तरुणीची आत्महत्या
सासरकडील लोकांच्या छळाला कंटाळून नवविवाहित तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 13-06-2016 at 00:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Newly married young woman committed suicide due to harassment