पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. आणखी दहा दिवस पुणे आणि पिंपरीत लॉकडाउन असणार आहे अशी घोषणा पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे. दोन्ही शहरांमध्ये दहा दिवसांनी लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे. आज हा निर्णय घेणार असल्याची कल्पना कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिली आहे. काही ठिकाणी मास्क वापरत नाहीत. काहींना करोनाचं गांभीर्य राहिलेलं नाही. लॉकडाउनच्या उपाययोजनांना लोक प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे दोन दिवसांनी पुन्हा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतलाय असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

कंटेनमेंट झोन वगळता पुण्यातील काही भागात लॉकडाऊन शिथिल केला होता. मात्र, अद्यापही करोनाचा धोका टळलेला नाही. तरीही पुण्यात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. नियमांचं पालन न केल्यास पुणे आणि पिंपरीमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाउन घेण्यात येईल असं आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.

India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
heat stroke patients maharashtra,
राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ७७ वर, मागील चार दिवसांमध्ये ३६ रुग्ण वाढले
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?

विधान भवनच्या ‘झुंबर हॉल’मध्ये शुक्रवारी कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातला इशारा दिला होता. आता मात्र त्यांनी आणखी पंधरा दिवस लॉकडाउन होणार हे जाहीर केलं आहे. दरम्यान आजच्या बैठकीच्या वेळी  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.

आणखी वाचा- पुण्यात लॉकडाउन का वाढला? जाणून घ्या ही पाच कारणं

लोकांना करोनाचं गांभीर्य अद्यापही कळलं नाही. आज झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. पुढील दोन दिवसांमध्ये १० दिवसांसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाउन लागू करण्यात येणार आहे. ज्या लोकांना भाजीपाला किंवा अन्य काही वस्तू खरेदी करायच्या असतील त्या त्यांनी करून ठेवाव्यात. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. आपल्याला करोनाची साखळी मोडणं आवश्यक आहे, असं पवार यावेळी म्हणाले.

यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनीही पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला होता. “करोनाचा धोका टळलेला नाही. तरीही पुण्यात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. वेळप्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चार दिवसापूर्वी दिला होता.

आणखी वाचा- मोठी बातमी! ठाण्यात लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ३० हजारांकडे गेली आहे. यापैकी १३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. तर ९०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसागणिक पुणे आणि पिंपरीमधील करोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक आहे.