03 March 2021

News Flash

पिपरी-चिंचवड : पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी ४८ जणांवर गुन्हा दाखल

नियम शिथिल करण्याची मागणी करत शेकडो नागरिकांनी केली होती गर्दी

पिंपरी-चिंचवडमधील आनंदनगर परिसरातील नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. या प्रकरणी ४८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आनंदनगर परिसर हा कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केलेला आहे. मात्र, तेथील नियम शिथिल करा असं म्हणत शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी प्रकरण शमवण्याच्या प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी अचानक पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गंभीर बाब म्हणजे चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टीमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित आढळले असून तो परिसर सील करण्यात आलेला आहे. परंतु, परिसरातील नियम शिथिल करा, असे म्हणून शेकडो नागरिक रस्त्यावर आले होते. तेव्हा, पोलीस प्रशासन आणि नागरिक असा सामना झाला. पोलिसांनी नागरिकांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र अचानक त्यांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. यात पोलिसांच्या वाहनांचे नुकसान झाले असून काही जणांना मुका मार लागला आहे.

याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी  ४८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 12:49 pm

Web Title: pimpri chinchwad a case has been registered against 48 people for throwing stones at the police cornavirus kjp 91 jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुणे – प्रेमप्रकरणातून २० वर्षीय तरुणाचा खून; सहा जण ताब्यात
2 टपाल वितरण यंत्रणा कोलमडली
3 पिंपरीत जनजीवन हळूहळू पूर्वपदावर, रस्ते गजबजले
Just Now!
X