03 June 2020

News Flash

पिंपरी-चिंचवड : नागरिकांच्या तपासणीसाठी आता विशेष ‘कोविड-19 टेस्ट बस’ सेवा

प्रामुख्याने कंटेन्मेंट झोन परिसरातील हायरिस्क नागरिकांची मोफत तपासणी होणार

पिंपरी-चिंचवड महानगर पालिका आणि कृष्णा डायग्नोस्टीक यांच्या सहकार्याने अत्याधुनिक प्रयोगशाळेची सुविधा असलेल्या ‘कोविड-19 टेस्ट बस’ सेवेचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते बुधवारी प्रारंभ करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरातील कंटेन्मेट झोनमधील हायरिस्क कॉन्टॅक्टमधील नागरिक, दुर्धर आजाराने त्रस्त तसेच जेष्ठ नागरिकांची मोफत करोना टेस्ट या अत्याधुनिक प्रयोग शाळेत करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात करोना बाधितांचा आकडा वाढत चालला असून अधिक जलद टेस्ट करण्यात याव्यात म्हणून अत्याधुनिक प्रयोगशाळाची सुविधा असलेल्या विशेष बसची निर्मिती करण्यात आली. यात कोविड-19 पूर्व चाचणी, मोबाईल एक्सरे, रक्त तपासणी व रक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे.

आणखी वाचा- Coronavirus: करोनामुळं पुण्यात पोलिसाचा दुसरा बळी

अशा प्रकारची सुविधा देणारी  ही पिंपरी चिंचवड शहरातील पहिली बस सेवा  आहे. या माध्यमातून वस्ती पातळीवर जाऊन काम केले जाणार असून या माध्यमातून कोविड-19 पूर्व चाचणी, मोबाईल एक्सरे, रक्त तपासणी व रक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे. अशा प्रकारे या मार्फत जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. प्रामुख्याने कंटेन्मेंट झोनमधील हायरिस्क कॉन्टॅक्ट मधील नागरिक व दुर्धर आजाराने त्रस्त व जेष्ठ नागरिकांची कोवीड पूर्व चाचणी या प्रयोगशाळेत विनामूल्य करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2020 8:52 am

Web Title: pimpri chinchwad covid 19 test bus is now in service for checking citizens msr 87 kjp 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 निर्बंध शिथिल, तरी नागरिकांनी काटेकोर खबरदारी घेणे अत्यावश्यक
2 शहरात दुकाने उघडण्यास सुरुवात
3 लक्ष्मी रस्त्यावरील व्यापार सुरू, ग्राहकांची प्रतीक्षा
Just Now!
X