05 December 2020

News Flash

पत्नी, सासू-सासऱ्यांच्या मारहाणीत पतीचा मृत्यू; निगडीतील घटना

काही वर्षांपासून पेत्रस हा पत्नी क्रिस्टिनापासून वेगळा राहत होता.

मृत पत्रेस पत्नी क्रिस्टिनाबरोबर

पिंपरी चिंचवड येथील निगडीमधील यमुनानगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी, सासू आणि सासऱ्याने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि.१५) रात्री ११:३० च्या सुमारास घडली आहे. पेत्रस जॉन मनतोडे अस मृत पतीचे नाव आहे. याप्रकरणी तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू लुसिया सूर्यकांत बोरडे (वय ५५), सासरा सूर्यकांत संतोष बोरडे (वय ५८, दोघेही रा. अनुपम वसाहत, यमुना नगर, निगडी) आणि पत्नी क्रिस्टिना पेत्रस मनतोडे (वय २८) या तिघांनी पेत्रस मनतोडे याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून हत्या केली आहे. गेल्या काही वर्षांपासून पेत्रस हा पत्नी क्रिस्टिनापासून वेगळा राहत होता. तो काही कामही करत नसत. त्यामुळे क्रिस्टिना ही आई-वडिलांकडे राहत असत. पेत्रस हा सासरी येऊन क्रिस्टिनाला मारहाण, शिवीगाळ करायचा. क्रिस्टिनाच्या आईवडिलांना याचा त्रास व्हायचा. तसेच तो बेरोजगारही होता.
शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मद्यपान करून तो क्रिस्टिनाच्या घरी आला होता. त्याने घराच्या बाहेर थांबून क्रिस्टिनाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर याचे भांडणात पर्यावसन झाले. क्रिस्टिनाने पेत्रसच्या अंगावर मिरची पूड टाकली आणि सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घातला. सासरे सूर्यकांत यांनी लोखंडी पान्याने पेत्रसच्या डोक्यात घाव घातले. सासू लुसिया हिने लाकडी धोपटण्याने डोक्यात जोरदार मारहाण केली. या तिघांच्या मारहाणीत पेत्रसच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पत्नी, सासू आणि सासरे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 11:21 am

Web Title: pimpri chinchwad nigdi wife father in law murdered husband
Next Stories
1 थंडाव्याचा यशस्वी घरगुती प्रयोग
2 नागरी सेवेत येऊन अपेक्षित बदल घडवा!
3 भाजप नगरसेवकाच्या तक्रारीमुळे पोलीस निरीक्षकाला अपमानास्पद वागणूक
Just Now!
X