पुण्यातील कोथरूड परिसरात रविवारी रात्री गस्त घालत असलेल्या पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केदारी असे जखमी झालेल्या पोलिसाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपास करून संशयास्पद कार कोथरूडमधील गोपीनाथनगरमधून ताब्यात घेतली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशीरा कोथरूडमध्ये गस्त घालत असताना एक संशयास्पद कार त्यांना दिसली. पोलिसांनी कारच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केल्यावर कारचालकाने त्यांच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये केदारी जखमी झाले. त्यांच्यासोबत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे यांनी त्यांच्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून संशयिताच्या दिशेने गोळीही झाडली. पण कारचालक वेगाने पळून गेला. त्यानंतर केदारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सोमवारी सकाळी संशयास्पद गाडी गोपीनाथनगर भागातून ताब्यात घेतली. अधिक तपास करण्यात येतो आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Apr 2016 रोजी प्रकाशित
पुण्यात गस्तीवरील पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न, एक पोलीस जखमी
संशयास्पद कार कोथरूडमधील गोपीनाथनगरमधून ताब्यात
Written by लोकसत्ता टीम

First published on: 25-04-2016 at 16:42 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police constable injured while trying to intercept a suspicious car