मुलांना जरब बसवण्यात पोलिसांना यश; शाळा, महाविद्यालयांकडून चांगला प्रतिसाद

शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आलेल्या ‘पोलीस काका’ या उपक्रमामुळे  गुंड प्रवृत्तीच्या मुलांना जरब बसविण्यात पोलिसांना बऱ्यापैकी यश आले आहे. शाळा तसेच महाविद्यालयाच्या परिसरात टवाळकी करणारी मुले, मुलींची छेड काढणे, रॅगिंगसारख्या घटना रोखण्यासाठी पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आलेल्या ‘पोलीस काका’ उपक्रमाला शहरातील विविध शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत शहरातील ७८४ शाळांमध्ये ‘पोलीस काका’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. पोलिसांकडून या शाळांमधील मुख्याध्यापक, प्राचार्याशी समन्वय साधून गैरप्रकार रोखण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.

पुणे पोलिसांकडून शाळा तसेच महाविद्यालयातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात  गैरप्रकार रोखण्यासाठी ‘पोलीस काका’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालयात गैरप्रकार घडल्यास बऱ्याचदा मुलांकडून पालकांना माहिती दिली जाते. भीतीमुळे मुले विशेषत: मुली पालकांपासून काही गोष्टी दडवून ठेवतात. शाळेच्या आवारात पोलीस पोहोचल्यास मुलांना एक प्रकारचा आधार मिळेल. मुले न घाबरता  घालणे, चित्रविचित्र हॉर्न वाजवणे असे एक ना अनेक उद्योग स्वयंघोषित प्रेमवीरांकडून केले जातात. फारच ओरड झाली तर पोलीस कधीतरी दखल घेतल्यासारखे करतात. एखाद्या ठिकाणी धरपकड मोहीम राबवतात, मात्र विद्यार्थी अल्पवयीन आहेत, त्यांच्या करीअरचे नुकसान होऊ नये म्हणून सौम्य भूमिका घेतात. विद्यार्थ्यांवर कारवाई होत नाही, त्याचाच पुढे गरफायदा घेतला जातो. अलीकडच्या काळात शाळा-महाविद्यालयात विद्यार्थी धारदार हत्यारे घेऊन येऊ लागले आहेत.  मात्र, अशा प्रकारांकडे दुर्लक्ष केले जाते. एखादे मोठे प्रकरण घडल्यास गळा काढण्याचे काम सुरू होते. त्यापेक्षा पोलिसांनी योग्य त्या मार्गाने सडक सख्याहरी व त्यांच्या पाठीराख्यांची टवाळखोरी मोडून काढण्याचे धोरण ठेवले पाहिजे व त्यांच्या कामात इतरांनी हस्तक्षेप न करता सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे, असा सूर आता व्यक्त होत आहे.

मध्यभागातील शाळांच्या परिसरात गस्त

शहराच्या मध्यभागात शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालये आहेत. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या भागातील शाळांच्या परिसरात काही गुंड प्रवृत्तीची मुले थांबतात. पोलीस काका उपक्रम सुरू केल्यानंतर पोलिसांना थेट विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधता येत आहे. पोलिसांकडून शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात गस्त घालण्यात येत आहे. तसेच महिला पोलिसांचे दामिनी पथक नियमित शाळांच्या परिसरात गस्त घालत असते, असे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.