01 March 2021

News Flash

दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

२९ एप्रिल ते २० मे या कालावधीत दहावीची आणि २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत बारावीची परीक्षा

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत दहावीची आणि २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत बारावीची परीक्षा होणार आहे.

राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी परीक्षेच्या तारखा आधीच जाहीर केल्या आहेत. मात्र राज्य मंडळाने विद्यार्थी आणि पालकांसाठी  सविस्तर संभाव्य वेळापत्रक  www.mahasscboard.in या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. या वेळापत्रकांबाबत काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या विभागीय मंडळांकडे, राज्य मंडळाकडे २२ फेब्रुवारीपर्यंत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रक माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाला छापील स्वरूपात देण्यात आलेले वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी खातरजमा करून घ्यावी. व्हॉट्सअ‍ॅप किंवा अन्य माध्यमातील वेळापत्रक ग्राह्य़ धरू नये, असे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 12:39 am

Web Title: probable schedule of 10th 12th examination announced abn 97
Next Stories
1 ‘स्वच्छ’ला महिन्याची मुदतवाढ
2 लोकजागर :  हळू बोला.. टेंडर उघडताहेत..
3 स्थायी समितीवर आठ नगरसेवकांची नियुक्ती
Just Now!
X