पुणेरी पाट्या म्हणजे जागतिक पातळीवर चर्चेचा विषय असल्याचं नेहमी म्हटलं जातं. त्यात बराच तथ्यांश देखील आहे. मात्र, याच पाट्यांच्या माध्यमातून एका पुणेकरानं ट्रॅफिक पोलिसांचा निषेध केला आहे. त्यासाठी त्यानं चक्क त्याच्या दुचाकीचं स्मारक उभारलं आहे. या स्मारकात गणेश मूर्तीची स्थापना करून त्यानं हा आगळा-वेगळा देखावा उभारला असून त्यावर आपली दुचाकी ठेवली आहे. सचिन धनकुडे नावाची ही व्यक्ती असून जून महिन्यात ट्रॅफिक पोलिसांनी उचललेली गाडी ८० दिवसांनंतर परत केली. झालेल्या मनस्तापाचा निषेध करण्यासाठी सचिन धनकुडे यांनी हे स्मारक उभारल्याचं सांगितलं.

bike memorial in pune
पुण्यात उभं राहिलं दुचाकीचं स्मारक!

 

Pimpri, Kiwale, pimpri mnc,
पिंपरी : किवळेतील दुर्घटनेनंतर पालिकेला जाग; होर्डिंगधारकांना दिला ‘हा’ इशारा
thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण
vasai, drunkard husband marathi news, bomb blast dadar marathi news
बायकोला धडा शिकविण्यासाठी अजब शक्कल, दादर आणि कल्याण स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी

काय आहे हे स्मारक?

कोथरूडच्या भुसारी चौकात स्मारक म्हणून उभारण्यात आलेल्या या बांधकामाच्या वर सचिन धनकुडे यांनी आपली दुचाकी ठेवली आहे. स्मारकाच्या बाहेरच्या बाजूला त्यांनी वेगवेगळे संदेश पाट्यांच्या डिझाईनवर लिहिले आहेत. यामध्ये, ‘भिऊ नकोस, पुढच्या चौकात पोलीस आहे’, ‘पार्किंगचे आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘माँ ने कहा शराब छोड दो बाबुजीने कहा घर छोड दो, पीछे बैठी पारू कह रही है सिग्नल तोड दो’, अशी वाक्य लिहिण्यात आली आहेत. यातून पार्किंग आणि वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती करण्यासोबतच आपली गाडी चूक नसताना उचलली असल्याचा देखील त्यांनी निषेध केला आहे.

bike memorial
पुण्यातील गाडीचे स्मारकवरील पाटी!

पाहा Photo : गाडीचं स्मारक, पुणेरी निषेध आणि वाहतूक पोलीस…पुणेकराची धम्माल शक्कल!

नेमकं काय झालं होतं?

सचिन धनकुडे यांनी सांगितल्याप्रमाणे, १५ जून रोजी नो पार्किंगच्या जागेत गाडी लावलेली नसताना देखील ट्रॅफिक पोलिसांनी गाडी उचलून नेली होती. त्यानंतर वाहतूक शाखेत जाऊन त्यांनी घडला प्रकार सांगितला. तरीदेखील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांची दुचाकी परत दिली नाही. शिवाय, या पोलिसांकडे नो पार्किंगमध्ये गाडी लावल्याचा फोटो देखील नव्हता. अनेकदा पाठपुरावा करून देखील गाडी परत न मिळाल्याने अखेर गणेशोत्सवाचं निमित्त साधून सचिन धनकुडे यांनी भुसारी कॉलनी मित्रमंडळातर्फे गाडीचं स्मारक हाच देखावा उभारला. अखेर वाहतूक पोलिसांनी उचलून नेल्यानंतर ८० दिवसांनी त्यांना गाडी परत केली.

यासंदर्भात वाहतूक पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.