News Flash

पुणे : ज्यूस सेंटरच्या वादातून तरुणाची हत्या; ४ संशयितांना भुसावळमध्ये पकडले

आपल्या कुटुंबासाठी तो कष्ट घेत असल्याचे परिसरातील लोकांचे म्हणणे आहे. मात्र, या व्यावसायातूनच त्याची हत्या झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

हत्या झालेला तरुण सनाउल हक.

भोसरीमध्ये चार अज्ञात तरुणांनी ज्यूस सेंटर चालकाचा धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रविवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चार संशयितांना भुसावळ येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सनाउल हक (वय ३२, रा. भोसरी) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सनाउल आणि हबीबूर रहमान यांनी काही दिवसांपूर्वी रुबेल शेख चालवत असलेले ज्युस सेंटर अधिक भाडे देऊन भागीदारीत चालवायला घेतले होते. मात्र, काही दिवसांनी त्यांच्यात वाद निर्माण झाला. या वादातूनच सनाउलची हत्या झाल्याचा संशय भोसरी पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शनिवारी रात्री उशिरा सनाउलला एकाने भोसरीच्या गावजत्रा मैदानावर बोलवून घेतले त्याठिकाणी त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर चौघांनी त्याला लोखंडी रॉडने मारहाण करीत कोयत्याने वार करून हत्या केली. त्यानंतर आरोपी फरार झाले, या चौघांना भुसावळ येथून ताब्यात घेण्यात आले असून भोसरी पोलिसांचे पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी भुसावळला रवाना झाले आहेत.

सनाउल हा गेल्या १४ वर्षांपासून भोसरी परिसरात राहात असून तो मुळचा पश्चिम बंगालचा आहे. त्याच्या मागे पत्नी आणि चार मुले आहेत. त्याचा तीन ठिकाणी ज्यूस सेंटरचा छोटा व्यवसाय आहे. आपल्या कुटुंबासाठी तो कष्ट घेत असल्याचे परिसरातील लोकांचे म्हणणे आहे. मात्र, या व्यावसायातूनच त्याची हत्या झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2018 4:01 pm

Web Title: pune the murder of a youth 4 suspects arrested in bhusawal
Next Stories
1 ‘निवडणुकीत उमेदवारांना उत्पन्नाचा स्रोतही सादर करावा लागणार’
2 मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू!
3 पैसे नको;  ताट, वाटी द्या
Just Now!
X