News Flash

खडसेंचा राजीनामा नको, बडतर्फीच हवी

मंत्रिमंडळातून तातडीने बडतर्फ करणे आवश्यक आहे.

radhakrishna vikhe patil : राधाकृष्ण विखे- पाटील

 

राधाकृष्ण विखे-पाटील यांची मागणी

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांचे गांभीर्य ध्यानात घेता त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फच केले पाहिजे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी केली. यासंदर्भात विखे-पाटील म्हणाले,‘‘एकनाथ खडसे यांनी राजीनामा द्यावा, या अनुषंगाने भारतीय जनता पक्षामध्ये प्रयत्न सुरू झाले असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत भाजप आपल्या आश्वासनांवर कायम असेल तर खडसेंचा राजीनामा घेतला जाऊ नये. त्यांना तातडीने सरकारमधून बडतर्फ करून त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन झाली पाहिजे. पुणे येथील एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात खडसे यांनी मंत्रिपदाचा दुरूपयोग करून आपल्या कुटुंबाला लाभ मिळवून दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणे निर्थक असून, त्यांना मंत्रिमंडळातून तातडीने बडतर्फ करणे आवश्यक आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 5:07 am

Web Title: radhakrishna vikhe patil slam on eknath khadse
Next Stories
1 अजित पवार यांचे ‘तारीख पे तारीख’
2 नियमभंगात विद्यापीठाचे विभागच आघाडीवर
3 कॉलड्रॉप टाळण्यासाठी २१ हजार टॉवर
Just Now!
X