लोकसभा आणि पाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा चालू बाजार मूल्यतक्त्याचे (रेडीरेकनर) दर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून कायम ठेवण्यात आले आहेत.

निवडणुकांमुळे सरकारने नागरिकांना रेडीरेकनरचे दर कायम ठेवून भेट दिल्याची चर्चा आहे. गेल्यावर्षी देखील रेडीरेकनरचे दर वाढवण्यात आले नव्हते. त्यामुळे २०१८-१९ चे दर २०१९-२० या आर्थिक वर्षांसाठी कायम ठेवण्यात आले आहेत. रेडीरेकनरच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव नगररचना विभागाकडून ठेवण्यात आला होता. याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बोलावलेल्या बैठकीला आमदार अनुपस्थित होते. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही दरवाढीला विरोध होता.  दरवर्षी १ एप्रिलपासून ‘रेडीरेकनर’चे नवे दर लागू होतात. त्यानुसार मालमत्तांची खरेदी, विक्रीचे व्यवहार होतात. बांधकामांचे दर अवास्तव झाले असल्याने यंदा ‘रेडीरेकनर’चे दर वाढवू नयेत, अशी मागणी करण्यात येत होती.