सहा दशकांपूर्वीची पुण्याची संस्कृती.. त्या काळातील समाजधुरीणांच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू.. सामाजिक परिस्थिती आणि सांस्कृतिक वातावरण.. या सगळय़ा अनुभवांना नर्मविनोदी शैलीत शब्दबद्ध करणाऱ्या शकुंतला परांजपे यांच्या लेखनाचे झालेले अभिवाचन.. ‘एकमेवाद्वितीय माझी आई : शकुंतला परांजपे’ या लेखाचे त्यांची कन्या आणि ज्येष्ठ नाटय़-चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांनीच केलेले अभिवाचन.. ‘मायलेकी’च्या लेखनातून सहज झरा फुटावा असा नर्मविनोदाचा धागा हा पैलू शनिवारी एका अनौपचारिक मैफलीमध्ये उलगडला.
संततिनियमनाच्या भरीव क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां आणि लेखिका शकुंतला परांजपे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजहंस प्रकाशनतर्फे शकुंतला परांजपे यांच्या लेखनाचे ‘निवडक शकुंतला परांजपे’ या पुस्तकासह सई परांजपे यांचे आठवणीवजा आत्मकथनपर पुस्तक प्रकाशित होणार आहे. ‘माझी प्रेतयात्रा’ आणि ‘भिल्लिणीची बोरं’ या शकुंतला परांजपे यांच्या दोन्ही पुस्तकांसह सई परांजपे यांनी आपल्या लेखनाचे हस्तलिखित दिलीप माजगावकर यांच्याकडे सुपूर्द केले. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, डॉ. मंगला नारळीकर, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, श्रीराम रानडे, नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ, डॉ. श्रीराम गीत, विनया खडपेकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, डॉ. रेखा इनामदार-साने, आनंद हर्डीकर यांनी या अनोख्या अभिवाचन मैफलीचा आनंद लुटला.
शकुंतला परांजपे यांच्या ‘माझी प्रेतयात्रा’ या ललितलेखाचे अभिवाचन ‘प्रभात’च्या चित्रपटांचे गीतकार शांताराम आठवले यांचे पुत्र सुदर्शन आठवले यांनी केले. आकाशवाणीवरील ‘पक्षी संमेलना’त कावळय़ाची भूमिका करणारा सुदर्शन अशी ओळख करून देत सई परांजपे यांनी त्या वेळी त्याला २५ रुपयांचा धनादेश दिला होता, अशी आठवण सांगितली. ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’ या धर्तीवर शकुंतला परांजपे यांनी लिहिलेल्या ललित लेखनातून परदेशी माणसाशी झालेला विवाह आणि त्यानंतरचा काडीमोड, संततिनियमनाचे काम करणारी म्हणजे धर्म बुडविणारी बाई ही समजूत, अंत्ययात्रेला ओंकारेश्वर घाटावर सनातनी कर्मठांचा झालेला विरोध याबरोबरच आपल्या श्रद्धांजली सभेमध्ये झालेली दिग्गजांची भाषणे या साऱ्या गोष्टींवर नर्मविनोदी शैलीत केलेले भाष्य अभिवाचनातून उलगडले.
‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘एकमेवाद्वितीय माझी आई : शकुंतला परांजपे’ या लेखाचे सई परांजपे यांनी अभिवाचन केले. या सदरामध्ये प्रसिद्ध होऊ न शकलेल्या दहा लेखांचा नव्या पुस्तकामध्ये समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. आईचे लेखन माजगावकर यांच्या वाचनात आले आणि या पुस्तकाच्या प्रती उपलब्ध नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे हे लेखन पुनर्प्रकाशित करण्याची इच्छा प्रदर्शित करून त्यांनी परवानगी मागितली. आईचे पुस्तक पुन्हा येत असल्याने मीही आनंदाने राजी झाले, असे सई परांजपे यांनी सांगितले.

‘वाचक स्वागत करतील’
ही पुस्तके राजहंस प्रकाशनकडे कशी आली याचा किस्सा दिलीप माजगावकर यांनी सांगितला. ते म्हणाले, ‘माझी प्रेतयात्रा’ हे पुस्तक वाचले आणि मला ते आवडले. पण, हे लोकांना आवडेल का याची चाचणी घेण्यासाठी आमच्या संपादक मंडळातील तरुण मुलींना वाचण्यासाठी दिले. त्या दोघींनीही हे लेखन आवडल्याचे सांगितले. तेव्हा पुनप्र्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. ‘माझी प्रेतयात्रा’ हे पुस्तक लग्नामध्ये किंवा वाढदिवसाला कसे भेट द्यायचे म्हणून त्याही काळात खपले नव्हते, असे सांगत सई परांजपे यांनी प्रकाशनासाठी अनुमती दिली. वाचक या लेखनाचे स्वागत करतील.

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
jalgaon, raver lok sabha seat, rohini khadse, eknath khadse, facebook page, remove father s image, ncp sharad pawar, bjp, maharashtra politics, lok sabha 2024, election 2024, marathi news,
रोहिणी खडसे यांच्या फेसबुक पानावर एकनाथ खडसे यांच्या छायाचित्रास फाटा
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार