अधिकची रक्कम मिळणार नसल्याचे स्पष्टीकरण

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सात पाठ्यवृत्तींना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाठ्यवृत्तीधारकांना त्यांचे प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची मुभा मिळाली आहे. मात्र वाढीव कालावधीसाठी अधिकची पाठ्यवृत्ती रक्कम दिली जाणार नसल्याचे यूजीसीने स्पष्ट के ले आहे.

डॉ. कोठारी पोस्ट डॉक्टरल फे लोशिप, डॉ. एस. राधाकृष्णन पोस्ट डॉक्टरल फे लोशिप, पोस्ट डॉक्टरल फे लोशिप, पोस्ट डॉक्टरल फे लोशिप फॉर एससी/एसटी, बीएसआर फे लोशिप, बीएसआर फॅ कल्टी फे लोशिप, एमिरेटस फे लोशिप या पाठ्यवृत्ती यूजीसीकडून देशभरातील विद्यार्थी, प्राध्यापकांना दिल्या जातात. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे संशोधन कार्यात अडथळे निर्माण झाले आहेत. याची दखल घेऊन पाठ्यवृत्तीधारकांच्या हितासाठी या पाठ्यवृत्तींना मुदतवाढ देण्याचा निर्णय यूजीसीने घेतला. त्याबाबत यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी परिपत्रक प्रसिद्ध के ले आहे.

विद्यापीठांनी पाठ्यवृत्तीधारकांना त्यांचे प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची मुभा विद्यापीठांना देता येईल. पाठ्यवृत्तीचा कालावधी कायम राहणार असला, तरी वाढीव कालावधीसाठीची पाठ्यवृत्ती रक्कम मिळणार नसल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.