26 November 2020

News Flash

काहीसा दिलासा; पुण्यात दिवसभरात ८८४ तर पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले ६५५ करोनाबाधित

पुण्यात ३७ जणांचा मृत्यू, पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ जणांचा मृत्यू

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पुण्यातील दोन्ही महापालिकांच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येकी दिवसभरात साधारण दीड हजार रुग्णांची नोंद होत होती. त्यातुलनेत आज पुण्यात ८८४ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ६५५ रुग्ण आढळल्याने काहीशी दिलासादायक स्थिती आहे.

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ८८४ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १ लाख ३२ हजार ६६५ एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ३ हजार १२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १,२५६ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख १२ हजार १७२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

तर, पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात नव्याने ६५५ जण करोनाबाधित आढळले असून ३१ जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. तर १ हजार १२२ जण करोनातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ८२७वर पोहचली असून यांपैकी ५७ हजार ११३ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार २१२ एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 9:14 pm

Web Title: something relief for pune people today 884 corona patients found in pune city and 655 in pimpri chinchwad aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 पुणे: सराईत गुन्हेगारांकडून १८ गावठी पिस्तूलं, २७ जिवंत काडतुसं हस्तगत
2 मुंबई, ठाण्यासह पुण्यात उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता
3 मुख्यमंत्र्यांनी ऊसतोड मजुरांना न्याय द्यावा, अन्यथा संप अटळ – आंबेडकर
Just Now!
X